मुंबई: बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिक तयार करण्याचे सत्र सुरु आहे. अता लवकरच कॅंग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या आयुष्यावर आधारित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सिनेमाचे नाव 'माय नेम इज रा गा' असे असणार आहे. सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. ट्रेलरमध्ये राहुल गांधींच्या आयुष्याशी निगडीत अनेक गोष्टी ट्रेलरमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला . इंदिरा गांधींची हत्या कश्या प्रकारे करण्यात आली. त्यानंतर राहुल गांधी राजकारणात सक्रिय कसे झाले अशा अनेक घटनांचा खुलासा सिनेमात करण्यात आला आहे. सिमेनाचे दिग्दर्शन रुपेश पॉल यांनी केले असून सिनेमात राहुल गांधी, इंदिरा गांधी यांच्या व्यतिरिक्त राजीव गांधी, प्रियंका गांधी, सोनिया गांधी यांच्या कारकिर्दीवर प्रकाश टाकण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


 


ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर चांगल्याच चर्चा रंगत आहेत. अगदी निवडणुकीच्या तोंडावर सिनेमाचे ट्रेलर प्रदर्शित करण्यात आले. सध्या राहुल गांधी आणि प्रियंका गांधी कॅंग्रेंस पक्षात महत्वाची भूमिका बजावत आहेत. बॉलिवूडमध्ये याआधी अनेक नेत्याच्या यशोगाथेवर प्रकाश टाकण्यात आला आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची यशोगाथा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित  करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आयुष्यावर आधरित सिनेमा लवकरच प्रक्षकांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात अभिनेता विवेक ऑबेरॉय पंतप्रधान मोदींची भूमिका साकारणार आहे.