मुंबई : बिग बॉस 14 चा उपविजेता राहुल वैद्यच्या लग्नाची त्याचे चाहते वाट पहात होते. 'बिग बॉस'च्या घरात राहुलने आपली गर्लफ्रेंड दिशा परमार हिला प्रपोज केले, त्यानंतर राहुल आणि दिशा आता लग्न कधी करणार याबद्दल चर्चा सुरू झाली होती. पण अखेर राहुल आणि दिशा यांनी लग्नगाठ बांधली आहे. राहुल वैद्यने फोटो शेअर करुन याबाबत माहिती दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


राहुल वैद्य याने इंस्टाग्रामवर लग्नाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत राहुल क्रीम कलरच्या शेरवानीमध्ये दिसत आहे, तर दिशाने गुलाबी रंगाचा लेहंगा परिधान केला आहे. हे क्यूट कपल आता विवाहबंधनात अडकले आहेत. 



फोटोत हे दोघेही एकमेकांकडे प्रेमाने पहात आहेत आणि हसत आहेत. राहुल आणि दिशाचा हा फोटो सोशल मीडियावर आता व्हायरल होत आहे. फोटोंवर प्रतिक्रिया देत त्याचे चाहते दोघांना शुभेच्छा देत आहेत.