मुंबई : अभिनेत्री दिशा परमार आणि गायक राहुल या दोघांनी नुकतीच लग्नगाठ बांधली. दोघांच्या लग्नानंतर लोकांनी त्यांचं खूप अभिनंदन केलं. मात्र, बर्‍याचवेळा सोशल मीडियावर स्टार्सना ट्रोलर्सचा सामना करावा लागतो. आता दिशाच्या बाबतीतही असंच झालं आहे.  राहुल वैद्यसोबतच्या इन्स्टाग्राम सत्रामध्ये दिशाने सिंदूर लावलं नव्हतं, त्याबद्दल एका युजरने तिला एक प्रश्न विचारला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंस्टाग्रामवर 2 मिलियन फॉलोअर्स पूर्ण झाल्याबद्दल राहुलने मंगळवारी रात्री दिशाबरोबर इंस्टा लाइव्ह सत्राचं आयोजन केलं. लाइव्ह दरम्यान दिशा परमार आणि राहुल वैद्य यांना चाहत्यांचं प्रेम मिळू लागलं, तर एका चाहत्याने दिशाला तिच्या कपाळावर सिंदूर न लावण्याबद्दल प्रश्न विचारला.


जरी दिशाने या प्रश्नाचे उत्तर अतिशय मजेदार पद्धतीने दिलं आहे. फॅनने विचारलं, 'तू सिंदूर का लावलं नाहीस?' त्यानंतर राहुलदेखील दिशाला विचारतो 'तू सिंदूर का लावलं नाहीस' यावर दिशाने देखील अतिशय मजेदार पद्धतीने पती राहुलकडे पाहिलं आणि म्हणाली, 'त्याने ते लावलं नाही. त्याला वेळ मिळत नाही. 'अभिनेत्री पुढे म्हणाली,' त्याने 'बिग बॉस'मध्ये प्रॉमिस केलं होतं की, तो दररोज मला सिंदूर लावेल. मात्र मला असं वाटतं की राहुलला आता त्याचं हे वक्तव्य आठवत नाही असं दिसतंय.' यानंतर राहुल म्हणाला, 'वेळ वेग-वेगळी आहे, जेव्हा रेडी होतेस तेव्हा स्वत: लावत जा. सिंदूर हे पतीचं निशाणी आहे. दिशा उद्यापासून दररोज सिंदूर लावत जा.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


खुद्द या लाइव्ह सेशनमध्येच अनेक चाहत्यांनी राहुल आणि दिशाला सगळ्यांसमोर  सिंदूर लावण्याची विनंती केली आहे. पण चाहत्यांच्या या गोष्टीवर दिशा परमार त्यांना बांगड्या दाखवते. यानंतर देखील राहूल आपल्या पत्नीला सांगतो की, 'सिंदूर हे पतीचे लक्षण आहे.'