मुंबई : शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा पोर्नोग्राफी प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर फार कमी वेळा सार्वजनिक ठिकाणी दिसला आहे. एवढ्या गंभीर आरोपानंतर जगाला सामोरे जाणे इतके सोपे नाही,हे राजच्या वागण्यावरुन दिसून येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, राज कुंद्राने धाडस दाखवले आहे आणि तो काही प्रसंगी पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. नुकताच राज कुंद्रा कुटुंबासह थिएटरमध्ये जाताना दिसला.


गंमत म्हणजे राजने चेहरा अशा प्रकारे लपवला की सगळेच त्याच्या या लूकबाबत चर्चा करु लागले आहेत. सार्वजनिक ठिकाणी जाणं देखील आता राज कुंद्रा कठीण झाल्याचं दिसून येत आहे.


राज कुंद्राने काळ्या रंगाचं हुडी जॅकेट घातलं होते. ज्यांच्या सहाय्याने त्याने संपूर्ण डोकं आणि चेहरा झाकला होता. राज या जॅकेटमध्ये चेहरा लपवून थिएटरमध्ये फिरताना दिसला. 


पापाराझीला पाहून त्याने हात दाखवत उत्तर दिले. चित्रपटगृहात त्याने एन्ट्री करताच काहीजण त्याला पाहून हसत आहेत, तर काहीजण राजचा चेहरा लपवल्यामुळे त्याला टोमणे मारत आहेत.


त्याचा हा अवतार पाहून चार चौघात तोंड दाखवायला ही जागा उरली नाही अशा प्रकारच्या प्रतिक्रिया द्यायला देखील सुरुवात केली आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 


राज कुंद्राला पोर्नोग्राफी प्रकरणी गेल्या वर्षी दोन महिने तुरुंगवासही भोगला आहे. नंतर त्याची जामिनावर तुरुंगातून सुटका झाली, त्यानंतर तो काही वेळा घराबाहेर दिसला. अनेक अभिनेत्रींनीही त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते.