मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (shilpa shetty) पती आणि व्यावसायिक राज कुंद्राच्या (Raj Kundra) अटक प्रकरणाला आज वर्ष पूर्ण होत आहे. वर्षभरापूर्वी याच दिवशी राज कुंद्रा (Raj Kundra) याला पॉर्न रॅकेट प्रकरणी  (porn case) अटक करण्यात आली होती. शिल्पा शेट्टीच्या (shilpa shetty) कुटुंबासाठी हा काळ खूप अवघड होता. पण शिल्पा आणि राज या दोघांनी मिळून परिस्थितीचा खंबीरपणे सामना केला. तुरुंगातून (Jail) बाहेर आल्यानंतर राज कुंद्रा (Raj Kundra) उघडपणे काहीही बोलला नाही. दरम्यान, या प्रकरणाला एक वर्ष पूर्ण होत असताना राज कुंद्राने सोशल मीडिया पोस्टद्वारे पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

21 सप्टेंबर 2021 रोजी राज कुंद्राचे नाव पॉर्नोग्राफी (pornography) प्रकरणात आलं होतं. या प्रकरणी राज कुंद्राला अनेक आठवडे आर्थर रोड तुरुंगात (arthur road jail) काढावे लागले होते. मात्र तुरुंगातून बाहेर आल्यावर त्याने काहीही बोलण्यास नकार दिला होता. (Raj Kundra reacts on his arrest)


त्यानंतर आता बरोब्बर वर्षभरानंतर राज कुंद्राने ट्विटरवर (twitter) प्रतिक्रिया दिली आहे. तुम्हाला पूर्ण गोष्ट माहीत नसेल तर गप्प बसा, असं ट्विटमध्ये राज कुंद्राने म्हटलं आहे. या पोस्टमध्ये राज कुंद्राने त्याच्यावर प्रेम करणाऱ्यांचे आभार मानले आहेत. त्याचवेळी ट्रोल करणाऱ्यांचेही आभार मानले आहेत. 


हुडी स्टाइलचा टी-शर्ट आणि चष्मा घातलेला फोटो राज कुंद्राने (Raj Kundra) या ट्विटसोबत जोडला आहे. "आज आर्थर रोड कारागृहातून बाहेर पडून  एक वर्ष पूर्ण होत आहे. सत्य लवकरच समोर येईल. सर्व हितचिंतकांचे आभार. ट्रोल करणाऱ्यांचेही आभार, तुम्ही मला आणखी मजबूत केलं आहे," असं राज कुंद्राने या ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्याच्यासोबत #enquiry #word #mediatrial #trollers सारखे हॅशटॅग देखील जोडले आहेत.



दरम्यान, एका मुलाखतीदरम्यान राज कुंद्राने स्वत:वरील आरोप फेटाळले होते. पोर्नोग्राफीच्या निर्मिती किंवा वितरणात मी कोणत्याही प्रकारे सहभागी नाही. या प्रकरणात आपल्याला जबरदस्तीने गोवले जात असल्याचे राजचे म्हणणे होते.