मुंबई :  अश्लिल चित्रपट चित्रीत करण्याच्या आरोपाखाली अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती  आणि उद्योजक राज कुंद्राला अटक केली आहे.  राज कुंद्रावर फक्त सॉफ्ट पॉर्न फिल्म तयार करण्याचे नाही तर व्हिडिओ ऍपवर अपलोड करण्याचे देखील आरोप करण्यात आले आहे. पोलिसांचा असा दावा आहे की राज कुंद्राने त्याच्या एका नातावाईकासोबत यूकेमध्ये कंपनी तयार केली आणि ही कंपनी पॉर्न चित्रपटांसाठी एजेन्ट्सला कॉन्ट्रॅक्ट द्यायची. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्राईम ब्रांचने दिलेल्या माहितीनुसार राज आणि त्याचा नातेवाईक प्रदीप बख्शी दोघांनी मिळून केनरिन  (Kenrin) नावाचं प्रॉडक्शन हाऊस  सुरू केलं होतं.  प्रदीप बक्षी यूकेमध्ये राहतो आणि तो कंपनीचा अध्यक्ष तसेच राज कुंद्रा पार्टनर आहे. सूत्रांनुसार राज कुंद्रा कंपनीचा मालक आणि गुंतवणूकदार देखील आहे. 



यादरम्यान एका व्हाट्सऍप ग्रुपचा खुलासा झाला आहे. या व्हाट्सऍप ग्रुपचं नाव 'H Accounts' असं आहे. या ग्रुपमध्ये आणखी 5 जण देखील सहभागी आहे.  पोलिसांना ग्रुपमध्ये होणाऱ्या चॅटबद्दल माहिती मिळाली आहे. ज्यामध्ये रेव्हेन्यूबद्दल बोलत असल्याचं दिसून येत आहे. शिवाय पोर्नोग्राफीमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीला किती पैसे द्यायचे आहेत, हे देखील चॅटमध्ये दिसत आहे. 



अश्लील चित्रपट बनवल्यानंतर ते मेल आयडीद्वारे केनरीन प्रॉडक्शन हाऊसमध्ये पाठविले जायचे. चित्रपट तयार झाल्यानंतर पैसे थेट संबंधित लोकांच्या खात्यात जमा व्हायचे. केनरीन कंपनीच्या माध्यमातून पॉर्न फिल्म सोशल मीडिया ऍप Hotshot वर अपलोड करण्यात यायचे. सध्या या प्रकरणी तपास सुरू आहे.