`राजा राममोहन रॉय हे ब्रिटीश सरकारचे चमचे` - पायल रहतोगी
पायलच्या या ट्विटमुळे ती नेटकऱ्यांमध्ये चांगलीच ट्रोल होत आहे.
मुंबई : इतिहासात अनेक महान राजांनी प्रजेसाठी लढा दिला. त्यांपैकी एक म्हणजे राजा राममोहन रॉय. पण त्यांच्यावर बॉलिवूड अभिनेत्री पायल रहतोगीने ट्विटरच्या माध्यमातून गंभीर आरोप केले आहेत. राजा राममोहन रॉय हे ब्रिटीश सरकारचे चमचे असल्याचा आरोप तिने केला आहे. राजा राममोहन रॉय हिंदू समाजसुधारक नव्हते तर ते ख्रिश्चन धर्माचा प्रसार करत होते. तिच्या या वक्तव्यानंतर ती सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल होताना दिसत आहे.
राजा राममोहन रॉय यांच्या काळात सती प्रथा बंद झाली होती. कारण तेव्हा देशातून मुघलांची सत्ता संपली होती, आणि ब्रिटीशांचे सरकार स्थापन झाले होते. राजा राममोहन रॉय नेहमी हिंदू कशा प्रकारे वाईट आहेत. त्यांच्या प्रथा देखील फार दृढ आहेत. हे सांगत असत, आणि ब्रिटीश धर्माचा प्रसार करत होते.
मुघल आक्रमनानंतर हिंदू महिला मुघलांच्या जाचापासून आपले संरक्षण करण्यासाठी जौहर करत असत. असे वक्तव्य पायलने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये केले आहे. पायलच्या या ट्विटमुळे ती नेटकऱ्यांमध्ये चांगलीच ट्रोल होत आहे.
पायल स्वत:ला स्त्रीवादी समजत असेल तर तिने आधी साडी खरेदी करायला हवी, अशी प्रतिक्रिया अभिनेत्री बिदिता बागने पायलच्या ट्विटवर दिली आहे. बिदिता शिवाय अनेकांनी पायलला धारेवर धरले आहे.