7 वर्ष या अभिनेत्रीसोबत लिव इनमध्ये राहत होते राजेश खन्ना
पाहा यांची लव्हस्टोरी
मुंबई : आज बॉलिवूडचे सुपरस्टार राजेश खन्ना यांची पुण्यतिथी आहे. राजेश खन्ना यांनी 40 वर्ष फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम केलं आहे. या 40 वर्षात त्यांच्या प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफमध्ये असे काही प्रसंग घडले जे आज ही चर्चेत आहेत. राजेश खन्ना यांच्या जीवनात गर्लफ्रेंड अंजू महेंद्रू हिचा प्रमुख रोल आहे. अंजू आणि राजेश हे एकमेकांची लहानपणापासूनचे मित्र होते. दोघांनी कॉलेजमध्ये देखील एकत्र अभ्यास केला आहे. मग ही मैत्री प्रेमात बदलली आणि त्यानंतर त्यांनी लिव इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. 1960 साली राजेश खन्ना सिनेमांत काम मिळावं म्हणून प्रयत्नशील होते. अंजू देखील मॉडेल असून ती देखील अभिनय क्षेत्रात प्रयत्नशील होती.
जेव्हा अंजू आणि राजेश खन्ना एकत्र आले तेव्हा करिअर बाजूला सारून तिने त्यांना मदत केली. रिलेशनशिपच्या सुरूवातीला राजेश खन्ना देखील अंजूची खूप काळजी घेत असे. हळू हळू राजेश देखील अंजूच्या सगळ्या इच्छा पूर्ण करत आहेत. जेव्हा राजेशने आपल्या करिअरमध्ये एक उंची गाठली तेव्हा त्यांनी अंजूला काम सोडण्याचा सल्ला दिला. अंजू, राजेश यांची वेडी होती. तिने त्यांच्या करिअरसाठी आपलं करिअर बाजूला ठेवलं. अंजू आणि राजेश एकाच घरात राहत असतं. अंजू, घरातील सर्व काम सांभाळत असे आणि राजेश खन्ना सिनेमांमध्ये काम करण्यात बिझी असे. राजेश यांची एका पाठोपाठ एक सिनेमे हिट होत होते. आणि तशी या दोघांमध्ये दरी निर्माण होत होती.
अंजू खूप बोल्ड विचारांची होती तर राजेश खूप पारंपरिक विचारांचे. यश मिळाल्यानंतरही राजेश आपले विचार बदलण्यास तयार नव्हते. अखेर राजेश आणि अंजू यांच्यात मतभेद निर्माण झाले. त्यांच्यात वाद होत असत आणि एका मुलाखतीत अंजूने सांगितलं होतं की, राजेश माझ्या स्कर्ट आणि साडीपर्यंत सगळ्यावरच बोट ठेवत असतं.