अभिनेते रजनीकांत रुग्णालयात दाखल
रूग्णालयाकडून प्रसिद्धीपत्रक जारी करून माहिती देण्यात आली आहे.
मुंबई : सुपरस्टार रजनीकांत प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल झालेत. हैदराबादच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. ब्लड प्रेशर मध्ये चढउतार झाल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल कऱण्यात आलं आहे. रूग्णालयाकडून प्रसिद्धीपत्रक जारी करून माहिती देण्यात आली आहे. त्यांना अन्य कोणतेही लक्षणं नसल्याचं देखील सांगण्यात येत आहे.
रजनीकांत त्यांच्या आगामी 'अन्नाथे' चित्रपटाच्या शुटिंगसाठी हैदराबादमध्ये आहेत. चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान सेटवर ८ जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर रजनीकांत यांनी स्वतःला क्वारंटाइन देखील केलं होतं. सध्या चित्रपटाची शुटिंग थांबवण्यात आली आहे.