मुंबई : दक्षिण सिनेसृष्टीचा सुपरस्टार रजनीकांत यांचं सोशल मीडियावरवर आगमन झालं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजकाल कलाकार त्यांच्या चाहत्यांसोबत कनेक्टेड राहण्यासाठी सोशलमीडियावर अ‍ॅक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न करतात. 


फेसबुक आणि इंस्टाग्रामवर रजनीकांत 


रजनीकांत यापूर्वी केवळ ट्विटरवर होते मात्र आता फेसबूक आणि इंस्टाग्रामवरही त्यांची दमदार एन्ट्री झाली आहे. इंस्टाग्रामवर रजनीकांत यांनी एक फोटो शेअर केला आहे. 



 



खास कॅप्शन 


रजनीकांत यांनी फोटोसोबत  ' त्यांना सांगा मी आलोय' अशा स्वरूपाचे कॅप्शन लिहले आहे. तामिळ भाषेत त्याने चाहत्यांना 'नमस्कार' म्हटले आहे. रजनीकांत यांनी लिहलेली ही पोस्ट 'कबाली' या चित्रपटातील एक डायलॉग आहे. कबाली ही एक गॅंगस्टर ड्रामा फिल्म आहे.  


सोशल मीडियावरही तुफान फॅन फॉलोविंग  


रजनीकांत यांना सोशलमीडियावरही तुफान फॅनफॉलोविंग आहे. फेसबुकवर अल्पावधीतच 1 लाखाहून अधिक तर इंस्टाग्रामवर 46.2k  पेक्षा अधिक फॅन फॉलोवर्स आहेत. रजनीकांत यांची दोन्ही अकाऊंट व्हेरिफाईड झाली आहेत. 


'काला' चित्रपट  


रजनीकांत यांचा 'काला' हा चित्रपट लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद मिळाला आहे.युट्युबवरही हा ट्रेलर ट्रेडिंगमध्ये होता. 


'काला' चित्रपट 27 एप्रिल रोजी हिंदी, तेलगू आणि तमिळ भाषांमध्ये रिलीज होणार आहे.