मुंबई : सुपरस्टार रजनीकांत यांनी मागील चार दशकांपेक्षा अधीक काळ चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. जगभरात त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी ते बॉलिवूड पर्यंतचा त्यांचा प्रवास फार प्रेरणादायी आहे. कालाविश्वातील त्यांचे योगदान फार अतुलनीय आहे. दाक्षिणात्य आणि बॉलिवूड कलाविश्वात आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या या कलाकाराला 'स्पेशल आयकॉन ऑफ गोल्डन ज्युबिली अवॉर्ड' या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोवा येथे रंगणाऱ्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात त्यांना या खास पुरस्कारने सन्मानित करण्यात येणार आहे. माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही आनंदाची माहिती दिली आहे. 



याशिवाय इफ्फीतील जीवनगौरव पुरस्कार यंदा ज्येष्ठ फ्रेंच अभिनेत्री इसाबेला ह्युपर्ट यांना प्रदान करण्यात येणार आहे. अशी घोषणा त्यांनी केली आहे. 'स्पेशल आयकॉन ऑफ गोल्डन ज्युबिली अवॉर्ड' रजनीकांत यांना जाहिर झाल्यानंतर त्यांनी देखील ट्विटरच्या माध्यमातून माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांचे आभार मानले आहेत. 


सुपरस्टार रजनीकांत यांनी त्यांच्या करिअरची सुरूवात १९९७ साली 'अपूर्व रागंगल' या तामिळ चित्रपटाच्या माध्यमातून केली होती. रजनीकांत यांना त्यांच्या उल्लेखणीय योगदानाबद्दल २००२ साली 'पद्मभूषण' तर २०१६ साली 'पद्मविभूषण' पुरस्कारने सन्मानित करण्यात आले होते.