मुंबई : सुपरस्टार रजनीकांत राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. रजनीकांत चैन्नई एअरपोर्टवर उतरले त्यावेळी पत्रकारांनी त्याला हाच प्रश्न विचारला. मात्र तेव्हा त्यांनी तुर्तास काही विचार नाही असे उत्तर दिले. आता मात्र रजनीकांत यांचे बंधू सत्यनारायण राव गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली आहे. रजनीकांत आपल्या राजकारणातील प्रवेशाची आणि राजकीय पक्षाची घोषणा जानेवारी महिन्यात करणार असल्याचे सत्यनारायण यांनी सांगितले.


कधी करणार राजकारणात प्रवेश? 


रजनीकांत राजकारणातील एंट्रीसाठी सज्ज आहे. याबाबत त्याने वारंवार संकेतही दिले आहेत. अर्थात रजनीकांत कोणता निर्णय घेतो, याकडे त्याच्या लाखो चाहत्यांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर रजनीकांत यांचे बंधू सत्यनारायण राव यांनी नव्याने माहिती देत हा मुहूर्त जानेवारीत असल्याचे सांगितल्याने उत्सुकता अधिकच ताणली गेली आहे.


धर्मपुरी येथे बोलताना सत्यनारायण यांनी रजनीकांत आपल्या पक्षाची आणि राजकारणातील प्रवेशाची घोषणा जानेवारीत करेल, असे स्पष्ट केले. त्यामुळे याबाबतच्या सगळ्या तर्कवितर्कांना पूर्णविराम मिळाला आहे.