Munna Bhai 3 : बॉलिवूड अभिनेता संजय दत्तचा 2003 मध्ये रिलीज झालेला 'मुन्नाभाई एमबीबीएस' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. या चित्रपटात मुन्ना आणि सर्किटच्या जोडीने बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले होते. 'मुन्नाभाई एमबीबीएस' नंतर 2006 मध्ये 'लगे रहो मुन्नाभाई' रिलीज झाला. हा चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशातच आता चाहत्यांसाठी दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी एका मुलाखतीत 'मुन्ना भाई 3'ची स्क्रिप्ट पूर्ण झाली असल्याची माहिती दिली आहे. त्यामध्ये म्हटलं आहे की, आतापर्यंत त्यांनी चित्रपटाच्या 4 ते 5 स्क्रिप्ट पूर्ण केल्या आहेत.


लवकरच प्रेक्षकांच्या भेटील येणार 'मुन्ना भाई 3'


राजकुमार हिरानी यांनी एका मुलाखतीत सांगितले की, 'मुन्ना भाई 3' चित्रपटाची स्क्रिप्ट पूर्ण केली आहे. 'मुन्ना भाई 3' साठी 5 स्क्रिप्ट पूर्ण केल्या आहेत. त्यापैकी काही मुन्नाभाई BALLB, मुन्नाभाई चले बेस, मुन्नाभाई चले अमेरिका आहेत. या खूप कठीण आहेत. राजकुमार हिरानी म्हणाले की, माझ्याकडे 'मुन्ना भाई 3' साठी एक अतिशय अनोखी कल्पना आहे. जी खूप आव्हानात्मक आहे. तरी देखील मी लिहिण्याचा प्रयत्न करत आहे. संजय दत्ताला 'मुन्ना भाई 3' बनवायचा आहे. मला आशा आहे की ते लवकरच क्रॅक होईल. मी माझे पुढील 6 महिने कोणासह घालवू शकतो हे पाहण्यासाठी मी काही स्क्रिप्टचे मूल्यांकन करत आहे. मी मुन्नाभाईबद्दल गंभीरपणे विचार करत आहे. असं राजकुमार हिरानी म्हणाले. 


2006 मध्ये प्रदर्शित झाला होता 'लगे रहो मुन्ना भाई'


2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मुन्ना भाई' चित्रपटात संजय दत्तसोबत अभिनेत्री ग्रेसी सिंग दिसली होती. तर दुसऱ्या चित्रपटामध्ये विद्या बालनने मुख्य भूमिका साकारली होती. गांधीजींवर बनवलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून देखील भरपूर प्रेम मिळाले होते. हा चित्रपट 19 कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली होती. या चित्रपटात बोमन इराणीचीही मुख्य भूमिका होती.