मुंबई : बॉलीवूड अभिनेता राजकुमार रावने 15 नोव्हेंबर 2021 रोजी त्याची प्रेयसी पत्रलेखाशी लग्न केले. दोघांच्या लग्नाचे फोटो आजही सोशल मीडियावर चर्चेत आहेत. या दोघांच्या लग्नानंतर आता चाहते त्यांच्या हनीमूनच्या फोटोंची वाट पाहत आहेत. पण, असे दिसते आहे की चाहत्यांना हनीमूनच्या फोटोंसाठी बराच काळ प्रतीक्षा करावी लागेल कारण राजकुमार-पत्रलेखा यांनी एका व्यक्तीमुळे त्यांचा हनीमूनचा प्लॅन पुढे ढकलल्याचं बोललं जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हनिमूनला जाण्यापूर्वी करणार शुटींग


 नवविवाहित जोडपे हनीमूनपूर्वी त्यांच्या अपूर्ण कामावर लक्ष केंद्रित करतील आणि त्यानंतर त्यांच्या हनीमूनला जातील. रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, राजकुमारला 18 नोव्हेंबरपासून अनुभव सिन्हा यांच्या 'भोद' चित्रपटाचे शूटिंग पुन्हा सुरू करायचे आहे.



राजकुमारने अनुभव सिन्हाच्या आगामी चित्रपटासाठी आधीच डेट फायनल केली होती आणि दोघांनी नोव्हेंबर ते डिसेंबरच्या सुरुवातीच्या काळात चित्रपटाचे शूटिंग करण्यास सहमती दर्शवली.


त्यामुळे राजकुमारने पत्रलेखासोबत हनिमूनला जाण्यापूर्वी चित्रपटाचे शूटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.