राजकुमार रावला `या` प्रतिष्ठित अवॉर्ड्समध्ये मिळाले नामांकन
न्यूटन हा २०१७ सालचा सगळ्यात महत्त्वाचा चित्रपट ठरला आहे.
मुंबई : न्यूटन हा २०१७ सालचा सगळ्यात महत्त्वाचा चित्रपट ठरला आहे.
२०१८ सालच्या ऑस्करसाठी या चित्रपटाची भारताकडून यशस्वी एन्ट्री ठरली आहे.
न्यूटन चित्रपटामध्ये राजकुमार राव याने प्रमुख भूमिका साकारली आहे. आता ऑस्करनंतर मानाच्या समजल्या जाणार्या एशिया पॅसिफिक स्क्रीन अवॉर्ड्समध्ये राजकुमार रावला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे नामांकन मिळाले आहे.
राजकुमार रावने ही बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली आहे.
२२ सप्टेंबरला हा चित्रपट रसिकांच्या भेटीला आला आहे. 'न्यूटन' चित्रपटाचे दिग्दर्शन अमित मसुरकर यांनी केले आहे.
राजकुमारने यात न्यूटन कुमारची भूमिका साकारली आहे. राजकुमार चे पात्र आदर्शवादी आणि सरकारी क्लार्कचे आहे. त्याला एका नक्षलवादी भागात मतदानाकरिता पाठवले जाते.