बॉक्सऑफिसवर रजनीकांतच्या `काला` ची जादू !
थलाईवा रजनिकांतचा `काला` हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे.
मुंबई : थलाईवा रजनिकांतचा 'काला' हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. नेहमीप्रमाणेच थलाईवाच्या चाहत्यांनी आपल्या लाडक्या सुपरस्टारचं जंगी स्वागत केल आहे. चैन्नईसह मुंबईत या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.
थलाईवाची जादू कायम
वयाच्या 67व्या वर्षीही सिनेरसिकांवर थलाईवा रजनिकांतची जादू कायम असल्याचं दिसत आहे. 'काला'चं दिग्दर्शन पी.रंजीतने केल आहे. पी.रंजीत यांनी रजनीकांतला कबालीमध्ये वेगळ्या अंदाजात पेश केलं होतं..पी.रंजीतचं दिग्दर्शन, धनुषची निर्मिती आणि खलनायकी भूमिकेत नाना पाटेकर या सगळ्यामुळे या सिनेमाबद्दल साहजिकचं उत्सुकता वाढली आहे.या सिनेमात रजनीकांत गॅंगस्टरच्या भूमिकेत दिसत आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करेलं असा विश्वास व्यक्त केला जात आहे.