मुंबई : विनोदवीर रजू श्रीवास्तव (Raju Srivastav) गेल्या 13 दिवसांपासून मृत्यूला झुंज देत आहे. त्यांची प्रकृती सुधारण्यासाठी  कुटुंब आणि चाहते प्रार्थना करत आहेत. राजू अद्यापही शुद्धीवर आलेले नाहीत, पण त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती सतत डॉक्टरांकडून देण्यात येत आहे. रिपोर्टनुसार राजू गेल्या 10 दिवसांपासून व्हेंटीलेटरवर आहेत. रोज राजू यांच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर येत असते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता राजू यांची मुलगी अंतराने पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, राजू यांची प्रकृती आता स्थिर आहे, परंतू अद्यापही ते शुद्धीवर आलेले नाहीत. रुग्णालयात राजू यांच्या उपचार सुरु आहेत. 


नुकताच, डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार राजू यांना शुद्धीवर येण्यासाठी आणखी 2 आठवडे लागणार आहे. तज्ज्ञ डॉक्टरांची टीम राजू श्रीवास्तव यांच्यावर 24 तास देखरेख करत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजूचा रक्तदाब आणि ऑक्सिजनची पातळी वाढली होती. त्यामुळे डॉक्टरांनी कोणालाही भेटण्यास नकार दिला आहे.


दरम्यान, राजू श्रीवास्तव यांना 10 ऑगस्टला वर्कआऊट करताना हृदयविकाराचा झटका (heart attack) आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.  बुधवारी राजू श्रीवास्तव सकाळी जिममध्ये वर्कआऊट करत असताना अचानक बेशुद्ध होऊन ते जमिनीवर पडले. त्यानंतर त्यांना तात्काळ एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं.