Raju Srivastava last Video :  कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju srivastava) यांच्या निधनानंतर कुटुंबियांसोबतच बॉलिवूडमध्येही शोककळा पसरली आहे. कायम लोकांना हसविणाऱ्या  राजू श्रीवास्तव यांनी आज प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणलं आहे. 10 ऑगस्ट 2022 रोजी जिममध्ये व्यायाम करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये गेल्या 41 दिवसांपासून ते मृत्यूशी दोन हात करत होते. मात्र आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 


'यमराजही घ्यायला आला...'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी मृत्यूविषयी वक्तव्य करणाऱ्या राजू श्रीवास्तव यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल  झाला होता. या व्हिडिओमध्ये राजू श्रीवास्तव (Raju Srivastava Video) आपल्या गजोधर शैलीत बोलत असताना सर्वप्रथम हात जोडून चाहत्यांना अभिवादन करत आहेत. त्यानंतर ते म्हणतात, 'कुछ नहीं, बस बैठे हैं। जिंदगी में ऐसा काम करो, कि अगर यमराज भी आएं, आपको लेने तो कहें, भाईसाहब भैसे पर आप बैठिए। नहीं नहीं, आप पैदल चल रहे हैं, अच्छा नहीं लग रहा है। आप भले आदमी हैं, नेक आदमी हैं, आप भैसे पर बैठिए, मैं पैदल चल लूंगा। ऐसे बनकर दिखाओ।' (Raju Srivastav last Video yamraj ke bhainse par baithoge comedy video viral on social media and raju shrivastav passed away nm)



हा व्हिडीओ शेअर करत राजू श्रीवास्तव सांगत होते की चांगला माणूस बना. फसवणूक करू नका त्याने कोणाचा फायदा होत नाही. हा व्हिडिओ त्याच्या सकारात्मकता, चैतन्य आणि मजेदार स्वरात कठीण परिस्थितीतही जीवन जगण्याचा संदेश देतो.  राजू श्रीवास्तव यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर #OmShanti #RajuSrivastava यांना श्रद्धाजंली वाहण्यात येतं आहे.