Raju Srivastava : प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी यासाठी त्यांचे कुटुंबिय आणि चाहते प्रार्थना करत आहेत. 12 ऑगस्ट रोजी जिममध्ये ट्रेडमिलवर वर्कआउट (WorkOut) करताना हृदयविकाराचा झटका आल्याने खाली पडले. त्यानंतर राजू श्रीवास्तव यांना तात्काळ एम्समध्ये (AIIMS-All India Institute of Medical Sciences) दाखल करण्यात आलं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तेव्हापासून त्यांच्या प्रकृतीबाबत रोज अपडेट समोर येत आहे. नुकतेचं राजू यांचा भाऊ दीपू श्रीवास्तवने त्यांच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट एका व्हिडीओच्या माध्यमातून दिली. राजू यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून संपूर्ण कुटुंब राजू यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत. तर डॉक्टर देखील त्यांचे प्रयत्न करत आहेत, अशी माहिती दीपू यांनी फेसबूकच्या माध्यमातून दिली आहे. 


राजू श्रीवास्तव यांचा चाहतावर्गही मोठा आहे. त्यांच्या चाहत्यांनी त्यांची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी यासाठी प्रार्थना केली आहे. कानपूरमधील चाहत्यांनीही राजू श्रीवास्तव यांच्यासाठी प्रार्थना करत एक वेगळाच संकल्प केला आहे.


राजू श्रीवास्तवसाठी कानपूरच्या व्यसनमुक्ती केंद्रातील तरुणांनी त्याच्यासाठी प्रार्थना केली आहे. तसेच राजू श्रीवास्तव बरे झाल्यासा आपण दारूला कायमचा निरोप देऊ असा संकल्प केला आहे.


गजोधर भैय्या उर्फ ​​राजू श्रीवास्तव हे त्यांचे आवडते विनोदी अभिनेते असल्याचे तरुणांनी सांगितले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे जेव्हापासून श्रीवास्तव यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेव्हा त्यांना दुःख झाले.


व्यसनमुक्ती केंद्रातील तरुणांनी त्यांच्यासाठी देवाकडे प्रार्थना करत, जर देवाने राजू भैय्याला बरे केले तर आम्ही दररोज हनुमान चालीसाचे पठण करू. दारूला हात लावणार नाही. दारू पिणे कायमचे बंद करु असे म्हटले आहे.


व्यसनमुक्ती केंद्रातील  डॉ. गौरव यांनी सांगितले की, केंद्रात हनुमान चालिसाचे पठण करून तरुणांनी राजू श्रीवास्तव बरे झाले तर दारू कायमची सोडू, अशी शपथ घेतली आहे.