मुंबई : राकेश बापट आणि शमिता शेट्टी टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय वादग्रस्त शो 'बिग बॉस ओटीटी' मुळे चांगलेच चर्चेत आहेत. दोघांच्या घरातील कनेक्शनची देखील चांगलीच चर्चा आहे.  'बिग बॉस ओटीटी' शो दरम्यान प्रेक्षकांचं लक्ष वेधण्यासाठी शमिता आणि राकेश एकमेकांच्या जवळ आले असल्याची चर्चा होती. पण आता शो संपल्यानंतरही दोघे एकमेकांना डेट करत आहेत. नुकताचं त्यानं एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. शिवाय दोघांनी त्यांच्या नात्याची अनेकदा कबुली देखील दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिग बॉसच्या घरात त्यांच्या केमिस्ट्रीने सर्वांना दंग केलं. दोघांनीही त्यांच्या नात्याला पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे. शमीताने खुप वेळा कबूल केले होते की तिला राकेश आवडतो आणि ती हे नाते पुढे नेऊ इच्छित आहे. त्याचवेळी राकेशने असेही म्हटले होते की, त्याला शमिता आवडते. त्यामुळे शमिता आणि राकेश नात्याबद्दल पुढे काय निर्णय घेतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 



राकेश आणि शमिता शेट्टी बिग बॉसच्या घराबाहेर भेटेल, आता असे दिसते की दोघांना एकमेकांना एकत्र अधिक समजून घ्यायचे आहे. अशा परिस्थितीत, राकेश आणि शमिता डिनर डेटसाठी भेटले. त्यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये दोघेही पापाराझीसाठी पोज देताना दिसत आहेत. शमिता शेट्टी बद्दल सांगायचं झालं तर ती लवकरच बिग बॉस 15 मध्ये जाणार आहे.