राखी सावंतने सनी लिओनीवर केले गंभीर आरोप
ड्रामा क्वीन राखी सावंतने आणखी एक धक्कादायक विधान केलं आहे.
मुंबई : ड्रामा क्वीन राखी सावंतने आणखी एक धक्कादायक विधान केलं आहे.
राखी सावंत कायम कॉन्ट्रोवर्सी निर्माण करणारी विधान करत असते. राखी सावंत म्हटलं की काही ना काही असणारच. आता राखी सावंतने आपला मोर्चा सनी लिओनीकडे वळवला आहे. राखी सावंतने सनी लिओनीवर गंभीर आरोप केले आहेत.
राखीने सनीवर लावले हे गंभीर आरोप
राखी सावंतने सनी लिओनीवर आरोप केले आहेत की, सनीने तिचा नंबर लाँस एंजिलस पॉर्न इंडस्ट्रीसोबत शेअर केला आहे. यामुळे तिला अॅडल्ट सिनेमांकरता अनेक फोन येत असल्याचं सनी म्हणाली आहे. आपल्याला माहितच आहे राखी सावंत कुणा ना कुणावर आरोप करून कायम चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असते. राखीने म्हटलं की ते लोक सतत तिला फोन करून त्रास देत आहेत. तसेच ते माझ्याकडे व्हिडिओ आणि मेडिकल सर्टिफिकेटची देखील मागणी करत आहे.
सनी लिओनीच्या मुलांबाबत केलं हे धक्कादायक वक्तव्य
राखी पुढे म्हणाली की, ‘मी सनीला तिला जुळी मुलं झाली त्याबद्दल शुभेच्छा देणारा एक व्हिडिओ शेअर केला होता. शुभेच्छांचा व्हिडिओ पाहिल्यानंतर सनीने मला एका वेगळ्या नंबरवरुन फोन केला आणि मी तिचा मत्सर करते का असा प्रश्न सनीने मला विचारला. मी सनीचा मत्सर का करेन? बॉलिवूडमध्ये मी चांगलं काम केलं आहे. प्रेक्षक सह-कुटूंब माझा सिनेमा पाहू शकतात. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की त्या क्षेत्राशी निगडीत लोकांनी माझ्या मोबाइल नंबरचा गैरवापर करु नये