माझे 50 बॉयफ्रेंड असतील..., Rakhi Sawant का संतापली?
Rakhi Sawant Sherlyn Chopra : सध्या सोशल मीडियावर राखी सावंत आणि शर्लिन चोप्रा यांची जोरदार चर्चा सुरु आहे. त्याच कारणही तसंच आहे. दोघींमध्ये जोरदार जुंपली आहे. शर्लिनने राखी सावंतला डिवचले आणि राखीचा पारा चांगलाच चढला आहे. माझे 50 बॉयफ्रेंड असतील, असं म्हणत राखीने शर्लिनच्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले आहे.
Rakhi Sawant Comment On Sherlyn Chopra: बातमी बॉलिवूडमधील मसाल्याची. लोक सोशल मीडियावर राखी सावंत (Rakhi Sawant) आणि शर्लिन चोप्रा (Sherlyn Chopra) यांच्यातील कॅट फाईटचा खूप आनंद लुटत आहेत. सगळ्यांनाच माहीत आहे की, ड्रामा क्वीन राखी सावंत कशी आहे. या ड्रामा क्वीन सोबत आता शर्लिन चोप्राही आहे. या दोघींमध्ये एका बाजूने जोरदा प्रहार आणि दुसऱ्या बाजूने पलटवार होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून बॉलिवूडमधील मसाला चर्चेत आहे. शर्लिन चोप्रा हिने राखी सावंतवर टीका केली. त्यानंतर राखीने जोरदार हल्लाबोल चढवला आहे. खरं तर, शर्लिन चोप्रा हिने राखी सावंत हिच्यावर वारंवार बॉयफ्रेंड बदलण्यावरुन निशाणा साधला होता. आता राखीने तिला जोरदार प्रत्युत्तर दिलेय आणि याचीच चर्चा सुरु झाली आहे.
काय म्हणाली होती शर्लिन चोप्रा?
शर्लिन चोप्रा (Sherlyn Chopra) हिने अलिकडेच राखी सावंत हिच्या बॉयफ्रेंड बदलण्याच्या सवयीवर भाष्य केले होते. राखी प्रत्येकवेळी बॉयफ्रेंड भाड्यावर घेते आणि नंतर त्यांना चांगलेच लुटते आणि गरीब बनवते. त्यानंतर ते पळून जातात. ही गोष्ट राखी सावंत हिच्या कानावर पडल्यानंतर ती गप्प बसणार थोडीच? रागाच्या भरात तिने जोरदार प्रहार केला. राखीने आता पुन्हा एकदा शर्लिनला चांगलेच टोकले आहे. राखी म्हणाली, 'माझे 50 बॉयफ्रेंड असतील, तुला त्याच्याशी काही देणं घेणं' इतकेच नाही तर राखी सावंतने पुन्हा एकदा शर्लिनची कॅमेऱ्यांसमोर नक्कल करत खूप काढली. (Main 50 Boyfriend Rakhun...Tu Kaun say Rakhi Sawant)
दोघींमध्ये का उडत आहेत जोरदार खटके?
कारण तुम्हाला माहीत नसेल, तर आम्ही तुम्हाला सांगतो की, नुकतीच शर्लिन चोप्रा साजिद खानविरोधात तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात पोहोचली होती. त्यानंतर काही दिवसांनी ती रडताना दिसली आणि ती म्हणाली की, साजिदवर कोणतीही कारवाई होत नाही. दरम्यान, राखी पहिल्यापासूनच साजिदला पाठिंबा करताना दिसली आहे. अशा स्थितीत तिने शर्लिनवर पापाराझींच्या कॅमेऱ्यांसमोर खोटे बोलल्याचा आरोप केला. त्यानंतर या दोघींमध्ये हे शाब्दिक युद्ध पाहायला मिळत आहे.