मुंबई : बिग बॉस 14च्या घराबाहेर पडल्यानंतरही राखी सावंतची मजा करायाची सवय काही संपलेली नाही. ती आजही त्याच मूडमध्ये दिसते. राखी सावंतच्या स्टाईलमुळे चाहत्यांना खूप हसू येतं. आता असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, जो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये राखी वेगळ्या स्टाईलमध्ये दिसत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांचं हसू अनावर झालं आहे. या व्हिडिओमध्ये राखी कंडोमची जाहिरात करताना दिसत आहे, तीही अगदी मजेदार पद्धतीने. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राखी बनली इंटरनॅशनल मॉडेल 
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या राखी सावंतच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, राखी हातात कंडोमचं पॅकेट घेवून उभी होती. तिने लाल रंगाचे जिमचे कपडे परिधान केले आहेत. ती म्हणतेय की, 'दुबईचा माल आहे, अरे! मी आंतरराष्ट्रीय मॉडेल बनले. या हबीबी या हबीबी, लेजा कभी भी....' त्याचवेळी गर्दीतल्या एका व्यक्तीने राखीला प्रश्न विचारला की, हे कसं वापरायचं?



राखी सावंतचं गाणं नुकतंच रिलीज झालं
राखी सावंत बिग बॉस 14 घराच्या बाहेर आल्यापासून सतत चर्चेत आहे. जेव्हा जेव्हा तिला  स्पॉट केलं जातं तेव्हा ती मजेदार पद्धतीने लोकांना खूप हसवते. नुकतंच राखीचं नवीन गाणंही रिलीज झालं आहे. 'मेरे ड्रीम में तेरी एंट्री ...' हे गाणं लोकांनाही खूप आवडलं आहे. रोज राखी तिच्या गाण्याचं प्रमोशन करताना दिसत असते.