Rakhi Sawant Comment On Sherlyn Chopra: साजिद खानवरून (Sajid Khan) शर्लिन चोप्रा आणि राखी सावंत यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध सुरू आहे. दोघीही एकमेकांवर घणाघाती आरोप करत आहेत. दिवसेंदिवस वाद पेटला असतानाच आता राखी सावंतने शर्लिन चोप्राविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर आता बॉलिवडच्या (Bollywood katta) कट्ट्यावर दोघींविषयी एकच चर्चा होताना दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राखी सावंतचा (Rakhi Sawant) एक व्हिडीओ सध्या समोर आलाय. त्यामध्ये ती स्वत:ला समाजसेविका म्हणत आहे. 'साजिद खान सारख्या निर्दोषांना फसवले जात आहे आणि मला समाजाची सेवा करायची आहे, कारण मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे.', असं राखी सावंत म्हणाली आहे. (Rakhi sawant files complaint against sherlyn chopra)


राखीने शर्लिन चोप्राविरोधात (Sherlyn Chopra) मानहानीची तक्रार दाखल केली असून अनेक गंभीर आरोपही केले आहेत. अॅडव्होकेट फाल्गुनीसोबत राखीने शर्लिनविरोधात मानहानीची तक्रार दाखल केली. पोलीस ठाण्यातून बाहेर आल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवादही साधला. त्यानंतर आता वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे.


आणखी वाचा- माझे 50 बॉयफ्रेंड असतील..., Rakhi Sawant का संतापली?


दरम्यान, शर्लिन चोप्राविरोधात अनेक पुरावे आणि व्हिडिओ आहेत... जे ती न्यायालयात सादर करणार असल्याचं वक्तव्य राखीने केलं आहे. भारतात महिलांसाठी खूप चांगले कायदे आहेत, पण काही लोक त्याचा चुकीचा फायदा घेत आहेत, असंही ती यावेळी म्हणाली आहे. आता हा वाद कोणतं वळण घेणार हे पाहणं ओत्सुक्याचं ठरणार आहे.