`इतना मारेंगे....`, भर रस्त्यात राखीचा तमाशा पाहून कोणाचा संताप?
ती तिच्या विचित्र स्वभावामुळे नेहमीच चर्चेत असते.
Rakhi Sawant Video: राखी सावंत ही नेहमीच आपल्याला वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. ती तिच्या विचित्र स्वभावामुळे नेहमीच चर्चेत असते. तिच्या कपड्यांपासून ते तिच्या विक्षिप्त विनोदापर्यंत ती कायम चर्चेत राहते. मध्यंतरी तिचे व्हिडीओज हे तूफान व्हायरल झाले होते. खासकरून लॉकडाऊनमध्ये तिचे अनेक व्हिडीओज व्हायरल झाले होते. आता पुन्हा एकदा राखीने एक नवा तमाशा केला आहे. यावेळी रस्त्यातच तिने तिचं नवीन नाटकं सुरू केलं आणि त्यामुळे नेटकऱ्यांनी तिला जबरदस्त ट्रोल केले आहे.
राखी नेहमीच आपल्या जीमच्या ठिकाणी स्पॉट होते. तिथे पापाराझी हे तिचा फोटो आणि व्हिडीओ काढण्यासाठी ती बाहेर येण्याची वाट पाहत असतात. नुकतीच ती आपल्या जीमच्या बाहेर स्पॉट झाली तेव्हा घरी जाण्यासाठी तिची कार तिला न्यायला आली आणि कारमध्ये बसताना पाठी असलेलं ट्रॅफिकपाहून ती भयंकर चिडली. ट्रॅफिक सुटला तरी ती काही गाडीत बसतं नव्हती. तेव्हा मागे उभ्या असलेल्या गाड्यांमधले ड्रायव्हर वैतागून हॉर्न वाजवायला लागले. तेव्हा राखीचा पारा चढला आणि ती म्हणाली, ''जोरात हॉर्न वाजवू नका. हम जहां पर खडे होते हैं लाईन वहॉं सेही शुरू होती हैं'', हा अमिताभ बच्चन यांचा डायलॉग मारून राखी गाडीत बसली. राखीच्या या डायलॉगवर सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरू झाली आहे. तिने रस्तात उभं राहूनच मारलेल्या या डायलॉगवरून राखीला ट्रोलर्सनी सुनावले आहे. एका ट्रोलरने कमेंट केली आहे की, ''बाहर लोग इतना मारेंगे ना की पूरा अमिताभ बच्चन उतार देंगे'' तर एकाने म्हटलंय की. ''रस्ता तेरे बाप का हैं क्या?''
आजकाल राखी या ना त्या कारणाने सतत चर्चेत असते त्यामुळे नेटकरी तिला सतत शिव्या घालत असतात. राखी सावंत आपल्या बॉयफ्रेंड आदिल खानसोबत सध्या सतत कुठे ना कुठे फिरताना दिसते आहे. तेव्हा आता राखी सावंत कुठला नवीन ड्रामा करतेय याकडे चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.