मुंबई : राखी सावंत आणि उर्फी जावेद खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. दोघंही अनेकदा सार्वजनिक ठिकाणी स्पॉट झाल्या आहेत. राखी आणि उर्फी अनेकदा एकमेकांसोबत दिसत असतात. पण नुकतंच राखी सावंतने असं काही सांगितलं आहे की, जे ऐकून उर्फी अभिनेत्रीवर नाराज होऊ शकते. राखी सावंतने अनेक गोष्टींमधून उर्फीच्या ओळखीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अलीकडेच राखी सावंतने उर्फी जावेदसाठी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना असं काही सांगितलं आहे की, ते ऐकून उर्फीला वाईट वाटेल. खरंतर उर्फी जावेद हे आजच्या काळातील एक प्रसिद्ध नाव आहे. ती तिच्या खास फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. उर्फी जावेदचे चाहते सोशल मीडियावर तिच्या नवीन पोशाखाची वाट पाहत असतात.


रणवीर सिंगनेही उर्फी जावेदच्या खास स्टाइलचं कौतुक केलं आहे. करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या चॅट शोमध्ये रणवीर सिंगने उर्फी जावेदला फॅशन आयकॉन म्हटलं होतं. उर्फी जावेद ज्याप्रकारे मीडियामध्ये हेडलाईन्स बनवत आहे, ती आता राखी सावंतही स्वीकारू शकणार नाही.


उर्फी जावेदच्या सार्वजनिक दिसण्यावर राखी सावंतने प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आपलं मत मांडलं आहे. उर्फी जावेद तिची कॉपी करत असल्याचं राखी सावंतने म्हटलं आहे. मात्र, तिने आता करिअरमध्ये चांगले स्थान मिळवलं आहे. राखी सावंतलाही वाटतं की, उर्फी जावेद खरोखरच चांगला फॅशन आयकॉन आहे. यासोबतच राखी सावंत म्हणते की, ती उर्फी जावेद आता मीडियासमोर आली आहे, याआधी मीडियामध्ये उर्फी कुठे होती.