मुंबई : बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) ही गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. राखीनं आदिल खान दुरानीवर (Adil khan) गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. आता आदिलच्या खान दुर्रानीच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाल्याचं दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राखी सावंतचा पती आदिल खान दुर्रानी सध्या सतत चर्चेत आहे. आदिलवर ड्रामा क्वीनने मारहाण आणि फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, त्याच्याविरुद्ध म्हैसूरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदिलच्या अडचणी वाढत आहेत. एकीकडे राखीने पतीवर मारहाणीचा आरोप केला आहे, तर दुसरीकडे म्हैसूरमध्ये त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका इराणी विद्यार्थिनीने ड्रामा क्वीनच्या पतीविरोधात तक्रार दाखल केली आहे.


वृत्तानुसार, इराणी विद्यार्थ्याने म्हैसूरमधील व्हीव्ही पुरम पोलिस स्टेशनमध्ये आदिल दुर्रानीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. अभिनेत्रीच्या पतीविरुद्ध आयपीसी कलम 417, 420, 376, 504 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणानंतर आता आदिलच्या अडचणी वाढल्या आहेत. आदिलने तिचे इंटिमेट फोटो लीक करण्याची धमकीही दिल्याचा आरोप विद्यार्थिनीने केला आहे.


इराणी विद्यार्थिनी म्हैसूरमध्ये डॉक्टर ऑफ फार्मसीचे शिक्षण घेत आहे
मिळालेल्या माहितीनुसार, इराणची एक विद्यार्थी म्हैसूरमधून डॉक्टर ऑफ फार्मसीचं शिक्षण घेत आहे. ही विद्यार्थिनी आदिलला डेझर्ट लॅब फूड अड्डा येथे भेटली, जिथे आदिल या फूड आऊटलेटचा मालक असल्याने दोघांची पहिली मैत्री झाली. मैत्रीनंतर हळूहळू दोघांची जवळीक वाढू लागली. आता या विद्यार्थिनीने आदिलवर आरोप केला आहे की त्याने लग्नाच्या बहाण्याने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले आणि म्हैसूरमधील एका अपार्टमेंटमध्ये तिच्यावर बलात्कार केला.