मुंबई : राखी सावंत सध्या तिचा नवीन बॉयफ्रेंड आदिल खान दुर्रानीमुळे चर्चेत आहे. आदिल राखीपेक्षा 6 वर्षांनी लहान असून दोघंही एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी दुबईला गेले आहेत. यादरम्यान राखी सावंतने तिचा बॉयफ्रेंड आदिलसोबतच्या नात्याबाबत मोठा खुलासा केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राखी सावंत लिव्ह इनमध्ये राहते
एका मुलाकतीमध्ये बोलताना राखी सावंत म्हणाली की, आदिल आणि मी एकत्र आहोत आणि एकत्र राहतो. आदिल लवकरच मुंबईला शिफ्ट होऊ शकतो. नुकतेच आम्ही दुबईवरून आलो आहोत. आणि लवकरच तो मुंबईत शिफ्ट होऊ शकतो.


आदिल मुंबईत व्यवसाय वाढत आहे
राखी सावंतने या मुलाखतीदरम्यान सांगितलं की, आदिलचा मुंबईत कारचा व्यवसाय आहे आणि तो या शहरात आणखी वाढवण्याचा विचार करत आहे. मी आणि आदिल मुंबईत डान्स अकादमी सुरू करण्याचा विचार करत आहोत.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


राखीला आदिलने प्रपोज केलं होतं
काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत राखी सावंतने त्यांच्या नात्याबद्दल बोलताना सांगितलं की, ही व्यक्ती देवाने माझ्यासाठी पाठवली आहे. रितेशसोबत लग्न तुटल्यानंतर मी डिप्रेशनमध्ये गेली होती.  तेव्हाच आदिल माझ्या आयुष्यात आला. त्याने महिनाभरातच मला प्रपोज केलं. खरं सांगायचं झालं तर मी यासाठी अजिबात तयार नव्हते. पण तो म्हणाला की तो माझ्यावर खूप प्रेम करतो आणि मग मी पण त्याच्या प्रेमात पडले.