रितेशल्या सोडल्यानंतर राखी सावंत पुन्हा अडकणार लग्नबंधनात?
ड्रामा क्वीन राखी सावंत नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.
मुंबई : ड्रामा क्वीन राखी सावंत नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. नुकतंच राखी सावंतने रितेशपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून त्यांनी ही माहिती दिली होती. सध्या राखी पंजाबमध्ये असून अफसाना खान आणि साज यांच्या लग्नाचा आनंद घेत आहे. ड्रामा क्वीनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या क्लिपमध्ये राखीने दुस-या लग्नाबद्दल असं काही सांगितलं आहे. जे ऐकून सगळेच थक्क झाले आहेत.
राखी सावंतने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंन्टवर अफसानाच्या लग्नाच्या बांगड्या आणि कलीरे तोडतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये राखी म्हणताना दिसत आहे की, ती लवकरच लग्न करणार आहे. ज्यामध्ये सर्वांना यावं लागेल. हे ऐकून तिथे उपस्थित असलेले सगळेजण थक्क होतात. यावर डोनल म्हणते की, कल रे राखीवर तुटून पडतील आणि ती पुन्हा राखीच्या लग्नाला हजेरी लावेल.. पण ड्रामा क्वीन खरंच लग्न करणार का? आणि जर राखीने लग्न केलं तर कोणासोबत करणार हे अद्याप कळालेलं नाही
तिच्या या व्हिडिओवर चाहते जोरदार कमेंट करत आहेत. काही दिवसांपूर्वी राखी सावंतने रितेशपासून वेगळं होण्याची घोषणा केली. इन्स्टाग्रामवर एक पोस्ट टाकून तिने ही माहिती दिली. राखी म्हणाली, 'सगळे चाहते आणि जे मला पसंती देतात. मी तुम्हाला सांगू इच्छिते की, रितेश आणि मी एकमेकांपासून वेगळे झालो आहोत. 'बिग बॉस' नंतर बरंच काही घडलं. अनेक गोष्टी घडल्या ज्या माझ्या नियंत्रणाबाहेर होत्या. आम्ही खूप प्रयत्न केले, पण शेवटी आम्ही आमचं आयुष्य वेगळे घालवायचं ठरवलं.
त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी राखी सावंतचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. ज्यामध्ये ती रडताना दिसली होती.