``शकल अकल कौन देखता है? पैसे असतील तर का नाही``, असं का म्हणाली ड्रामा क्वीन राखी सावंत?... पाहा व्हिडीओ
नुकतीच ती एका आगाळ्या वेगळ्या लुकमध्ये दिसली.
मुंबईः राखी सावंत हे व्यक्तिमत्त्व सध्या सोशल मीडियावर चांगलेच धुमाकूळ घालते आहे. नुकतीच ती एका आगळ्या वेगळ्या लुकमध्ये दिसली. डोक्यावर मोठ्या ग्लोडन केसांचा भोंगा करत तिने जोकरसारखे कपडे घातले होते. तिचा हा नवा लुक बघून सोशल मीडियावर सगळेच हसत सुटले होते.
आयपीएलचा ललित मोदी आणि बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन सध्या त्यांच्या अफेअरमुळे चर्चेत आहेत. यावेळी जिकडे पाहावे तिकडे या दोघांचीच हवा आहेत. या दोघांच्या नात्याबद्दल प्रत्येकजण आपापल्या प्रतिक्रिया देत आहे. काही लोक त्यांच्या नात्याचे कौतुकही करताना दिसत आहेत तर दुसरीकडे काही लोक त्यांच्यावर टीकाही करत आहेत. इंडस्ट्रीची ड्रामा क्वीन राखी सावंतचे नावही या प्रकरणाशी आता जोडलं जात आहे.
नुकतीच ती एका ठिकाणी स्पॉट झाली, तिचा हा लुक पाहून पापाराझींनी तिला घेरले. आणि तिच्या लुकचे खूप कौतूक केले तर काहींनी तिची फजिती उडवली. सध्या सुष्मिता सेन आणि ललित मोदीची सगळीकडे चर्चा असल्याने आता राखीला त्याबद्दल विचारले. तेव्हा राखीने दिलेलं उत्तर धक्कादायक होतं. राखीने ललित मोदी आणि सुष्मिताच्या नात्याची तर चक्क खिल्ली उडवली आहे.
राखी म्हणाली, "कोण आहे ललित मोदी?" यावर एका पापाराझीने तिला सांगितले की तो आयपीएलचा एक्स चेअरमन आहे आणि त्याच्यावर पैसे घेऊन पळून गेल्याचा आरोप आहे. यावर आश्चर्यचकित होऊन बॉलीवूडची ड्रामा क्वीन राखी म्हणाली, पैसे घेऊन पळून गेलास तर तुला कोणीही मोठी हिरोईन मिळेल... आजकाल पैसे नसतील तर विचारतं कोण? आजकाल रूप कोणाला दिसत नाही. ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्याकडे लोक जातात, पण राखी सावंत जात नाही. राखीला पैसा नाही तर प्रेम हवं आहे.
राखीने त्यांच्या नात्याबद्दल प्रश्न विचारला तेव्हा ती म्हणाली, "वाह ललित जी, क्या हाथ मार है, सिधा सुष्मिता सेन". असं म्हणत राखीने त्या दोघांची खिल्ली उडवली आहे. राखी असंही म्हणाली की, ‘मी जेव्हा दोघांना पाहिले तेव्हा मला ते बाप आणि मुलगी वाटले’.
राखीच्या या विधानावरून सगळीकडे हास्याचा स्फोट झाला आहे.