राखीचा जलवा सुरूच! कॉन्ट्रोव्हर्शिअल क्विन Rakhi Sawant पुन्हा अडकणार लग्नबंधनात? नवा VIDEO व्हायरल
Rakhi Sawant Viral Video : राखी सावंतचा अजून एक व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. यामध्ये राखी सावंत (Rakhi Sawant Viral Bridal Video) वधूच्या वेशात बाहेर आली आहे आणि आपल्या पतीचा उल्लेख करत परत तिनं काहीतरी नौंटकी करण्याचा प्रयत्न केला आहे.
Rakhi Sawant Viral Video : राखी सावंत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत असते. मध्यंतरी आदिल खान दुरानी (Rakhi Sawant and Adill Khan Durrani) यांच्यासोबत झालेल्या विवाहानंतर राखी सावंत मोठ्या प्रमाणात चर्चेत आली होती. त्यातून सोशल मीडियावर फक्त तिच्याच चर्चांना उधाण (Rakhi Sawant Social Media) आले होते. आता राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिचा एक नवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये आता राखी दुसऱ्याच एका पुरूषासोबत नटलेल्या नवरीप्रमाणे (Rakhi Sawant Bridal Video) दिसते आहे. त्यामुळे आता राखी सावंत पुन्हा एकदा विवाहबंधनात (Rakhi Sawant Marriage) अडकणार का याचीच सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे राखीचा जलवा सुरूच आहे आणि आता कॉन्ट्रोव्हर्शिअल क्विन (Controversial Queen) राखी सावंत हिनं पुन्हा एक नवा ड्रामा सुरू केला आहे. तेव्हा पाहूयात नक्की या व्हिडीओमध्ये आहे तरी काय? (Rakhi Sawant New Viral video rakhi wears bridal constumes and remembers her husband adil khan who is in jail viral news marathi)
यावेळी राखी सावंत ही नटूनथटून एका नवरीप्रमाणे या व्हिडीओत दिसते आहे. आदिल खान दुरानीसोबत कधी राखीचं लग्न होतंय अशी बातमी येते तर दुसऱ्याच क्षणी आदिलशी (Adil Khan in Police Station) लग्नचं काय नातंच तुटतं अशीही बातमी येते. सध्या अभिनेत्री राखी सावंतच्या आयुष्यात मोठी वादळं आल्याचं पाहायला मिळते आहे. त्यामुळे तिचे चाहते एकच गोंधळून गेले होते त्यातून आता पुन्हा एकदा तिचा नवा व्हिडीओ पाहून आता तिचे चाहते पुन्हा एकदा हैराण झाले आहेत. त्यामुळे सगळीकडेच सध्या या व्हिडीओचीच चर्चा आहे.
आदिल आणि राखीच्या लग्नाचे प्रकरण इतके वाढले होते की हे प्रकरण थेट पोलिसांपर्यंत गेले होते. राखीनं आदिलवर अनेक आरोप-प्रत्यारोप (Rakhi Sawant Allegations on Adil Khan Durrani) केले होते. त्यामुळे आदिल आणि राखीच्या लग्नाचे प्रकरण प्रचंड गाजले होते. इतके की आदिलला आता तुरूंगाची हवा खावी लागते आहे. अजूनही आदिल हा तुरूंगातच आहे. अशावेळी आता राखीच्या या नव्या व्हिडीओनं सगळ्यांनाच बुचकळ्यात पाडले आहे. राखीची नवी नौटंकी पुन्हा एकदा सुरू झाली आहे.
यावेळी नटूनखटून आलेल्या राखीनं या व्हिडीओमध्ये (Viral Video) अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. त्याचसोबत या व्हिडीओमध्ये बोलताना राखीनं आदिलाचाही उल्लेख केला आहे. या व्हिडीओमध्ये ती म्हणते की, ''माझे एकच लग्न झाले आहे. मला आता परत लग्न करायची इच्छा नाही त्यातून आता मी नवरीसारखा पोशाष परत कधीच घालणार नाही त्यामुळे मी या पोशाख आज तुमच्यासमोर आहे. माझा एकच नवरा आहे आणि तो सध्या तुंरूगात आहे'', अशा प्रकारे राखीनं या व्हिडीओतून आपले स्वगत मांडले आहे.
या व्हिडीओत राखी सावंत आपल्या पतीबद्दलही बोलताना दिसते आहे. ती बोलते की, ''वधू इथे आणि वर तिथे तुरूंगात... तूही आनंदीत राहा आणि मीही आनंदीत राहण्याचा प्रयत्न करते'', असं म्हणत तुरूंगात असणाऱ्या आदिलची (Trending Video) राखीनं आठवण काढली आहे.