राखी सावंत बॉयफ्रेंडसोबत पोहोचली पोलीस स्टेशनला, ओक्साबोक्सी रडली; केले हे आरोप
Rakhi Sawant Video: राखी सावंत (Rakhi Sawant) हिचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती रडताना दिसत आहे. तिने प्रियकरासह पोलीस ठाणे गाठले.
मुंबई : Rakhi Sawant Video: राखी सावंत (Rakhi Sawant) हिचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती रडताना दिसत आहे. तिने प्रियकरासह पोलीस ठाणे गाठले. राखी सावंत (Rakhi Sawant) काहीना काही कारणाने रोजच चर्चेत असते. सध्या ती तिच्या नव्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. पण नुकताच राखीचा एक व्हिडिओ (Rakhi Sawant Video) समोर आला आहे, ज्यामध्ये ती कॅमेऱ्यासमोर रडताना दिसत आहे.
राखीने का गाठले पोलीस ठाणे?
राखी सावंत (Rakhi Sawant) हिने नुकतेच मीडियासमोर तिचे दु:ख कथन केले आहे. तिने सांगितले की, त्याचे सोशल मीडिया अकाउंट हॅक झाले आहेत. तिला घाणेरडे मेसेज येत असल्याचेही राखी हिने म्हटले आहे. याच कारणावरुन राखी सावंतने तिचा प्रियकर आदिल दुर्राणी याच्यासह मुंबईतील ओशिवरा पोलीस स्टेशन गाठले. राखीने येथे तिचे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झाल्याची तक्रार केली होती.
राखीचे सोशल मीडिया अकाउंट हॅक
राखी सावंतने माजी पती रितेशवर तिचे सोशल मीडिया अकाउंट हॅक केल्याचा आरोप केला आहे. मीडियासमोर रडत राखी सावंतने रितेशवर आरोप केला की तो माझे आयुष्य उध्वस्त करत आहे. तो म्हणतो की, मी तुला आणि आदिलला बर्बाद करीन. मी तुला आणि आदिलला एकत्र राहू देणार नाही.
माजी पतीवर आरोप
राखी सावंत (Rakhi Sawant) हिने रितेशबद्दल पुढे सांगितले की, तीन वर्षांत त्याने माझ्यासोबत खूप गैरवर्तन केले आहे. तो मला घराबाहेर काढायचा आणि शिवीगाळ करायचा. आता तो माझ्या सोशल मीडियावर हल्ला करत आहे. माझे सर्व फेसबुक, इंस्टाग्राम अकाउंट हॅक करुन त्याने हे काम केले आहे. तो मला का त्रास देत आहे? मी अद्याप त्याच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. मात्र तो मला आत्तापर्यंत ब्लॅकमेल करत आहे. मी आता पोलिसात आले आहे. मला माहित नाही की माझी आतमध्ये चौकशी कशी होईल. पण माझा मुंबई पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. ते मला साथ देतील.