Rakhi Sawant Fake Marriage : बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंतनं (Rakhi Sawant) काही महिन्यांपूर्वी तिचा आणि रितेशचा (Ritesh) घटस्फोट झाल्याचे सांगितले होते. दरम्यान, काल राखीनं तिच्या आणि बॉयफ्रेंड आदिलच्या (Rakhi Sawant Adil Durrani Wedding) लग्नाचे फोटो शेअर केले होते. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. राखीनं आदिल खान दुर्रानीसोबत मुस्लिम परंपरेनं विवाह केला. दरम्यान, आदिल खाननं त्याचं आणि राखीचं लग्न झालं नाही असं म्हटलं आहे. त्याच्या नकारावर राखी सावंतनं तिची प्रतिक्रिया दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आदिल खाननं त्यांच्या विवाहाला नकार दिल्यानंतर राखी सावंत दु: खी आहे. तिनं हा विवाह वैध असल्याचे सांगितले. राखीनं नुकतीच टाईम्स नाऊला दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 'त्याच्या बहिणीच्या लग्नामुळे त्याने मला एक वर्ष आमचा विवाह उघड न करण्यास सांगितले. मी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि बिग बॉस मराठी सीझन 4 (Marathi Big Boss Season 4) मध्ये गेले. जेव्हा मी त्या घरात होते, तेव्हा घराबाहेर अनेक गोष्टी घडल्या, ज्या माझ्या हातात नव्हत्या. त्यामुळे मी लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मी घाबरले होते. तो माझ्यावर खूप प्रेम करतो, पण तो आमच्या विवाहाला का नाकारतोय? त्याच्या कुटुंबाकडून नक्कीच दबाव येत असावा.' (Rakhi Sawant and Adil Durrani Marriage) 



राखी आणि आदिलचं लग्न (Rakhi Sawant And Adil Durrani Wedding Photo) 
समोर आलेल्या फोटोत दोघांनीही त्यांच्या कोर्ट मॅरेजचं प्रमाणपत्र हातात धरलं आहे. आदिल आणि राखीच्या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. या फोटोंमध्ये राखीने पांढरा आणि गुलाबी रंगाचा ड्रेस घातला आहे तर दुसरीकडे आदिल सिंपल लूकमध्ये दिसत आहे. त्याने काळ्या शर्टसोबत डेनिम जीन्स घातली आहे. त्याचबरोबर, दुसऱ्या फोटोत दोघंही त्यांच्या लग्नाच्या कागदपत्रांवर सही करताना दिसत आहेत.