राखी सावंतच्या आईला गंभीर आजार, शेअर केली भावूक पोस्ट
बिग बॉसमधून 14 लाख घेऊन बाहेर पडली राखी
मुंबई : रिऍलिटी शो 'बिग बॉस १४' ची (Bigg Boss 14) स्पर्धक राहिलेल्या राखी सावंतने (Rakhi Sawant) एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये राखी सावंतने भावूक (Rakhi Sawant emotional post on Mother) पोस्टमध्ये आपल्या खासगी (Rakhi Sawant Emotional Post goes viral on Social Media) आयुष्यातील महत्वाची गोष्ट शेअर केली आहे. राखी सावंत आपल्या आईच्या खूप जवळ आहे. या पोस्टमध्ये तिने आईसाठी प्रार्थना करायला सांगितलं आहे. सध्या राखीची आई एका भययानक आजाराला सामोरं जात आहे.
राखी सावंतने स्वतः आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. तिथे तिने आपल्या आईला कॅन्सर झाल्याची माहिती दिली आहे. त्याचसोबत तिच्यासाठी प्रार्थना करा, असं देखील म्हटलं आहे. कॅन्सर सारख्या महाभयंकर आजाराने राखीच्या आईला ग्रासल आहे.
राखीने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये राखीची आई दिसत आहे. कॅन्सरमुळे राखीच्या आईचे केस गेल्याचे स्पष्ट दिसत आहे. राखी सावंतची आई गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होती. राखीच्या आईवर आता किमोथेरपीचे उपचार सुरू आहेत. याचीच माहिती राखीने सोशल मीडियाद्वारे दिली आहे.
राखी बिग बॉसमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली. राखीने यावेळी प्रेक्षकांचं खास मनोरंजन केलं. शोच्या टॉप 5 फायनलिस्टमध्ये तीने आपली जागा निर्माण केली. राखी सावंतने सगळ्यांना एकच धक्का दिला. तिने फिनालेमध्ये 14 लाख घेऊन शोच्या बाहेर गेली.