`हा` पोलीस अधिकारी होणार राखी सावंतचा तिसरा नवरा! पाकिस्तानात लग्न, भारतात रिसेप्शन तर हनीमून...

बॉलिवूडची `ड्रामा क्वीन` राखी सावंत वयाच्या 46 व्या वर्षी तिसऱ्यांदा लग्नाच्या बंधात अडकणार आहे. पाकिस्तानात मुस्लिम पद्धतीने राखीचे लग्न होणार आहे. जाणून घेऊया कोण आहे राखीचा होणारा नवरा.
Rakhi Sawant Marriage News : बॉलिवूडची 'ड्रामा क्वीन' राखी सावंत वयाच्या 46 व्या वर्षी तिसऱ्या लग्नाच्या तयारीत आहे. राखी सावंतचा होणारा नवरा हा पाकिस्तानात पोलिस ऑफिसर आहे. पाकिस्तानात लग्न होणार असून भारतात रिसेप्शन पार्टी होणार आहे. लग्नानंतर हनीमूनला कुठे जाणार हे देखील राखी सावंतने सांगितले आहे. जाणून घेऊया राखी सावंतच्या होणाऱ्या नवऱ्याविषयी.
हे देखील वाचा... भारतातील सर्वांत सुंदर महाराणीने परिधान केली 100 वर्ष जुनी पैठणी साडी; यांच्या सौंदर्यापुढे सगळं काही फेल!
बॉलिवूडमध्ये नेहमीच चर्चेत राहणारी आणि आपल्या बेताल वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेली राखी सावंत तिसऱ्यांदा लग्न करण्याच्या तयारीत आहे. अलीकडेच टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत राखी सावंतने तिच्या लग्नाविषयी सांगितले.
2019 मध्ये राखीने एनआरआय रितेशशी लग्न केल्याची माहिती आहे. मात्र, 2022 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर तिने आदिल खान दुर्रानी याच्यासह लग्न केले. आदिलसोबत लग्न करण्यासाठी तिने इस्लाम धर्म स्वीकारला होता. तिने तिचे नाव बदलून राखी सावंत फातिमा ठेवल्याचा दावा करण्यात आला होता. आदिलने सुरुवातीला नकार दिला असला तरी नंतर राखीसोबतचे लग्न मान्य केले. राखीने 2023 मध्ये मक्का येथे पहिला उमराह केला होता. मात्र, आदिलह तिचा घटस्फोट झाला. राखीपासून घटस्फोट घेतल्यानंतर आदिलने सोमी खानशी लग्न केले.
राखी सावंत आता तिसऱ्यांदा लग्न बंधनात अडकणार आहे. मला लग्नासाठी अनेक प्रस्ताव येत होते. मात्र, मला माझे खरं प्रेम पाकिस्तानमध्ये मिळाले आहे. दोडी खान हा माझा प्रियकर आहे. लवकरचं आम्ही लग्न करणार आहोत. दोडी खान एक अभिनेता तसेच पोलीस अधिकारी असल्याचे राखीने सांगितले.
पाकिस्तानात इस्लामिक रितीरिवाजानुसार आमचे लग्न होणार आहे. लग्नाची रिसेप्शन पार्टी भारतात असेल. तर, हनिमूनसाठी आम्ही स्वित्झर्लंड किंवा नेदरलँडला जाऊ असे राखीने सांगितले.लग्नानंतर आम्ही दुबईत राहणार असल्याचेही राखीने सांगितले. राखी सावंत तिच्या पर्सनल लाईफमुळे नेहमीच चर्चेत असते. आता मात्र, तिचे तिसरे लग्न हे पब्लीसिटी स्टंट आहे की नेमकं काय आहे ते लग्नानंतर स्पष्ट होईल.