मुंबई : ड्रामा क्वीन राखी सावंत तिच्या नव्या बॉयफ्रेंडमुळे चर्चेत आहे. नुकताच या अभिनेत्रीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. नेहमी धमाल स्टाईलमध्ये दिसणारी राखी सावंत पुन्हा एकदा तिच्या विचित्र अंदाजात दिसली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या अनोख्या स्टाईलने अनेकदा चर्चेत राहणाऱ्या राखी सावंतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. ताज्या व्हिडिओमध्ये राखी सावंत काळ्या रंगाच्या साडीत दिसत आहे. ड्रामा क्वीनसोबत अभिनेता अर्जुन बाजवाही दिसत आहे. या क्लिपमध्ये अभिनेत्री ग्रॅज्युएशन कॅप आणि गाऊनमध्ये दिसत आहे.


व्हिडिओमध्ये राखी आता डॉ बनल्याचं सांगताना दिसत आहे. आपल्या कौशल्याने तो मुन्नाभाईलाही मागे सोडेल. अभिनेता अर्जुननेही राखीचे अभिनंदन केलं.  राखी आता डॉक्टर झाली असून मी तिचा पेशंट असल्याचंही अभिनेता म्हणाला.. या पदवीसाठी पापाराझींनी राखी सावंतचेही अभिनंदन केलं आणि ड्रामा क्वीनने गृहपाठही केला नाही तरीही डॉक्टर बनली.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलायचं झालं तर, आजकाल राखी सावंत दुबईस्थित बिझनेसमन आदिलला डेट करत आहे. अनेकदा दोघंही एकत्र स्पॉट होतात. राखी आणि आदिलची जोडी चाहत्यांना खूप आवडते. दोघांनी एकत्र येऊन सगळ्या अफवांना पूर्णविराम दिला असला तरी त्यांच्या ब्रेकअपची बातमी यापूर्वीही समोर आली होती.