Rakhi Sawant : डोळ्यातील पाणी पुसत गाणं गाऊन राखीने दिला आईला शेवटचा निरोप; ख्रिचन पद्धतीने झाले अत्यंसंस्कार
कधीच कोणाची आई कोणालाच सोडून जावू नये. आईला निरोप देताना राखी सावंत (rakhi sawant) अत्यंत भावूक झाली होती. तिच्या डोळ्यातील अश्रु थांबतच नव्हते.
Rakhi Sawant Mother Death: 'ड्रामा क्वीन' अशी ओळख असलेली अभिनेत्री राखी सावंतवर (Rakhi Sawant) दुःखाचा डोंगर कोसळला आहे. राखी सावंतची आई जया भेदा यांचे शनिवारी (27 जानेवारी) ब्रेन ट्यूमर आणि कर्करोगामुळे निधन झाले आहे. रविवारी जया भेदा यांच्यावर ख्रिचन पद्धतीने अत्यंसंस्कार करण्यात आले. डोळ्यातील पाणी पुसत गाणं गाऊन राखीने दिला आईला शेवटचा निरोप दिला (Rakhi Sawant Mother jaya bheda Funeral).
राखीची आई जवळपास तीन वर्षांपासून कॅन्सरवर उपचार घेत होती. त्यातच त्यांना ब्रेन ट्यूमर झाल्याचेही निदान झाले. मागील दोन महिन्यापासून क्रीकेअर रुग्णालायत राखीच्या आईवर उपचार सुरु होते. मल्टीऑर्गन फेल्युअरमुळे आईचं निधन झालं अशी माहिती राखीने स्वत: दिली.
रविवारी सकाळी राखीच्या आईचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी फरा खान, रश्मि देसाई यांच्यासह अनेक कलाकारांनी राखीच्या आईचे अंतिम दर्शन घेतले. यावेळी या कलाकारांनी राखीचे सांत्वन देखील केले.
ख्रिश्चन धर्माच्या रितीरिवाजानुसार राखीच्या आईवर अंतिमसंस्कार करण्यात आले. आईला निरोप राखी खूपच भाविक झाली होती. तिच्या डोळ्यातील अश्रु थांबत नव्हते. राखी सतत रडत होती. तिचा नवरा आदिल तिच्यासोबत होता.
डोळ्यातील अश्रु पुसत राखीने आईला गाण्यातून श्रद्धांजली अपर्ण केली. राखी आणि तिच्या कुटुंबीयांनी आईला निरोप देताना श्रद्धांजली पूर्वक गाणं गाऊन शोकाकुल वातावरणात निरोप दिला. आईची सर्व वेदनांमधुन सुटका झाली आहे. ईश्वर तिच्या आत्म्याला शांतो देवो अशी प्रार्थना राखीने यावेळी केली.
उपचारासाठी पैसा गोळा करण्यासाठी राखीचे प्रयत्न सुरु होते. अशा अडचणीच्या परिस्थित प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) तिच्या मदतीला धावून आले होते. मुकेश अंबानी यांनी देखील राखी सांवतला आईच्या उपचारासाठी मदत केली होती. आई मोठ्या आजाराशी झुंज देत असल्याने तिच्या उपचारासाठी पैसा गोळा करण्यासाठी राखीचे प्रयत्न सुरु होते.
राखी अनेकदा आपल्या आईच्या आजरपणादरम्यानच्या उपचाराचे व्हिडीओ इन्स्टाग्रामवरुन शेअर करायची. तिने सोशल मीडियावरुन आपल्या आईच्या प्रकृतीबद्दल अनेकदा भाष्य केलं आहे. राखीने आपल्या आईवरील उपचारांसाठी सलमान खानने अनेकदा मदत केल्याचा उल्लेख केला होता. सलमान अनेकदा आईच्या तब्येती बाबत चौकशी करतो असंही राखी म्हणाली होती.