नवी दिल्ली: बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटीजनी सोमवारी रक्षाबंधन केले. अनेकांनी सोशल मिडियावर आपले फोटोज शेयर केले तर काहींनी भाऊ बहीण न भेटल्यामुळे सोशल मिडियावर दुःख व्यक्त केले. याच दरम्यान मंगळवारी मिस युनिव्हर्स सुश्मिता सेनने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून रक्षाबंधन सेलिब्रेशनचा एक व्हिडीओ शेयर केला आणि त्याचबरोबर एक इमोशनल मेसेज देखील लिहिला. व्हिडीओमध्ये सुश्मिता भावुक झालेली दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


या व्हिडीओमध्ये सुश्मिता आधी आपल्या भावाला राखी बांधत आहे आणि त्यानंतर सुश्मिताच्या तीन मुली आपल्या आईला राखी बांधतात व पाय पडून आशीर्वाद घेतात. रक्षाबंधनाच्या दिवशीचे काही खास क्षण.. आपल्या भावाची बहीण बनण्यापासून मुलींचा भाऊ बनण्यापर्यंत...  काय दिवस होता. हा दिवस नेहमी माझ्या हृदयाजवळ राहील.. अलिशाचा साष्टांग नमस्कार हृदयस्पर्शी होता, अगदी तिच्या नावाप्रमाणे... ईश्वराचा आशीर्वाद... असे लिहून तिने हा व्हिडीओ शेयर केला. 




सुश्मिताने आपल्या मुलींबरोबर व्हिडीओ शेयर करण्याची ही पहिली वेळ नसून ती नेहमी आपल्या मुलींसोबतचे व्हिडीओ सोशल मिडियावर शेयर करत असते.