अभिनेता राम चरणच्या बहिणीचा घटस्फोट, पोस्ट शेअर करत म्हणाली `आम्ही...`
Niharika Konidela Divorce: निहारीका आणि चैतन्य यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या घटस्फोटाची माहिती दिली होती. त्यांच्या या निर्णयानं अनेकांना आश्चर्य झाले आहे.
Niharika Konidela Divorce: चित्रपटसृष्टी म्हटलं की त्यांच्या आयुष्यावर सगळ्यांसमोर सोशल मीडियावर चर्चा होते. ते काय करतात त्याचं खासगी आयुष्य ते त्यांचं काम सगळ्याच गोष्टींवर चर्चा होते. त्यात सगळ्यात जास्त चर्चा असते त्याच्या अफेअर्स आणि लग्नाची. त्याचा ग्रॅंड असा विवाह सोहळा प्रत्येक व्यक्तीसाठी एका ड्रिम वेडिंगसारखा असतो. अनेक लोक त्यांना कॉपी करतात. दरम्यान, चिरंजीवी यांची भाची आणि वरुन तेजची बहीण निहारिका कोनिडेला आणि चैतन्य जोनलगड्डा यांनी घटस्फोट घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु होत्या. मात्र, आता त्यांनी अधिकृतपणे घटस्फोटाची बातमी चाहत्यांना दिली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यात काही ठीक नाही अशा चर्चा सुरु होत्या. इतकंच काय तर त्यांच्या घटस्फोटाविषयी देखील म्हटले जात होते. ते दोघे गेल्या काही दिवसांपासून वेगळे राहत होते असे म्हटले जात होते. निहारिका कोनिडेला आणि चैतन्य जोनलगड्डा या दोघांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करत त्यांच्या घटस्फोटाविषयी सांगितले आहे. त्या दोघांना लग्नाच्या दोन वर्षात घटस्फोट घेतला आहे. यावेळी त्या दोघांनी मिळून विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. इतकंच काय तर त्यांनी सगळ्यांना विनंती केली आहे की ही गोष्ट शांततेनं घ्या. कुटुंबानं आणि ज्या मित्रांनी त्यांची साथ दिली त्यांचे आभार मानले आहे. यासोबत त्यांनी सगळ्यांना प्रायव्हसी मिळावी अशी विनंती केली आहे.
निहारिका कोनिडेलानं कुकटपल्ली कोर्टात घटस्फोटाची याचिका दाखल केली होती. या याचिकेत निहारिकानं न्यायाधिश यांना विनंती केली होती की तिला तिचा पती चैतन्य जोनलगड्डाकडू घटस्फोट हवा आहे. तर त्या दोघांनी सहमतीनं घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.
निहारिका कोनिडेला आणि चैतन्य जोनलगड्डा यांनी डिसेंबर 2020 मध्ये शाही विवाह केला होता. तर लग्नाच्या दोन वर्षांनंतर आता त्या दोघांमध्ये वाद वाढू लागले होते. त्यांना हे जाणवलं की ते दोघे एकाच घरात राहू शकत नाही. त्यामुळे त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. निहारिकानं एप्रिल महिन्यात चैतन्यसोबतचे सगळे फोटो सोशल मीडियावरून डिलीट करून टाकले होते. तेव्हा पासूनच त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यानंतर काय तर निहारिका तिच्या भावाच्या साखरपुड्यातही एकटी दिसली होती. त्यामुळे या चर्चा अजून जास्त सुरु झाल्या होत्या आणि अनेकांनी म्हटले की त्यांचा घटस्फोट झाला आहे.
हेही वाचा : दगडासारखा चेहरा म्हणत 'या' अभिनेत्याला केलं होतं रिजेक्ट, हॉलिवूडमध्ये मिळाला मोठा ब्रेक ...
निहारिका ही अभिनेता आणि निर्माता नागेंद्र बाबू आणि पद्मजा यांची लेक आहे. तर चिरंजीवी आणि पवन कल्याण यांची भाची आहे. वरुण तेज तिचा भाऊ आहे. तर राम चरण, अल्लू अर्जुन, साई धरम तेज आणि वैष्णव तेज हे तिचे चुलत भाऊ आहेत. निहारिका सध्या अभिनय क्षेत्रात करिअरकडे लक्ष देत आहे. निहारिका लवकरच 'डेड पिक्सल्स' या डिज्नी प्लस हॉटस्टार वरील सीरिजमध्ये दिसणार आहे.