Ram Charan : लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता राम चरण हा आंध्र प्रदेशच्या कडप्पाच्या 80 व्या राष्ट्रीय मुशायरा गजल कार्यक्रमात पाहुणा म्हणून पोहोचला होता. खरंतर त्यानं या कार्यक्रमात हजेरी लावण्याचं वचन हे ए आर रहमान यांना दिल्याचे म्हटले जाते. त्यानंतर राम चरणनं दुर्गा देवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. यावेळी राम चरणला पाहण्यासाठी मंदिरात चाहत्यांनी गर्दी केली होती. यावेळी गर्दी अनियंत्रित झाली तर पोलिसांना चक्का लाठीचार्ज करावा लागला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राम चरणचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. यावेळी राम चरणनं काळ्या रंगाचा कुर्ता पायजमा परिधान केला होता. त्यानं मंदिरात दर्शन करण्यासाठी जाण्याआधी त्यानं अयप्पा दीक्षा पालन केलं होतं. सुरुवातीला राम चरण हा त्याच्या गाडीतून बाहेर येऊन त्याच्या चाहत्यांना नमस्कार करताना दिसतोय. तर दुसरीकडे त्याच्या गाडीच्या समोर गर्दी होत असल्याचं पाहून पोलिस तिथे असलेल्या लोकांवर लाढीचार्ज केला आहे. घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. 



एकीकडे काही नेटकरी राम चरण आणि त्याच्या चाहत्याला ट्रोल करत आहेत तर दुसरीकडे काही नेटकरी राम चरणची बाजू घेताना दिसत आहेत. एक नेटकरी म्हणाला, 'त्याच्या चाहत्यांना काही झालं तर त्याला जबाबदार कोण? त्यांना काही झालं तर आई-वडिलांना सहन करावं लागणार.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'राम चरणची रॉयल एन्ट्री.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'काय मूर्ख लोकं आहेत.' 


हेही वाचा : 'प्रचाराच्या भाषणांमधील नको नको त्या शब्दांचे, हातवारे...', गिरीश ओक यांचा मतदारांनाच सवाल


दरम्यान, त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. सगळीकडे राम चरणला पाहण्यासाठी झालेल्या गर्दीनं चांगलाच गोंधळ झाला. तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये राम चरण हा त्याच्या चाहत्यांना संबोधताना दिसत आहे. मंदिरात राम चरण हा आध्यात्मिक साधनेचा भाग झाला आहे. त्यांनं पूजा केली आणि आशीर्वाद घेतला. अयप्पा दीक्षा 41 दिवसांची आध्यात्मिक साधना असते. ज्यात भक्त हे अयप्पाचं अनुशासन पालन करताना दिसतात आणि आणि बाकी सगळ्या गोष्टींपासून लांब राहतात. या सगळ्याचा उद्देश हा फक्त सबरीमाला तीर्थयात्रा सुरु करण्याआधी आध्यात्मिक विकास आणि पवित्रता मिळवणं असतं.