मुंबई : कंगना राणौत सध्या आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत कंगनाने अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा उल्लेख 'सॉफ्ट पॉर्न स्टार' असा केला. यानंतर या दोघींमध्ये वाद सुरू झाला आहे. उर्मिला देखील कंगनाला प्रत्युत्तर देत आहे. या दरम्यान आता दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी ट्विट करून उर्मिलाला साथ दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राम गोपाल वर्माने ट्विटमध्ये म्हटलंय की,'मला यामध्ये नाही पडायचं आहे. पण माझं असं म्हणणं आहे की, उर्मिला मातोंडकरने रंगीला, सत्या, कौन, भूत, एक हसीना थी सारख्या सिनेमांत कॉम्प्लेक्स भूमिका साकारून आपलं वेगळंपण सिद्ध केलं आहे.' उर्मिलाने राम गोपाल वर्मा यांच्यासोबत 'रंगीला' सिनेमात काम केलं असून आपलं वेगळंपण सिद्ध केलं आहे. दोघांनी यासोबत अनेक सिनेमांत काम केलं आहे. जे सिनेमे बॉक्स ऑफिसवर हिट ठरले आहे. (कंगनाचा जया बच्चन यांच्यावर पलटवार, 'हिरो के साथ सोने के बाद...')


 



कंगनाच्या कमेंटवर उर्मिलाची प्रतिक्रिया कंगनाने उर्मिला मातोंडकरचा उल्लेख 'सॉफ्ट पॉर्न स्टार' केल्यानंतर जोरदार चर्चा रंगली. यानंतर उर्मिलाने एका मुलाखतीत म्हटलं की,'एका व्यवस्थित समाजातील अशी कोणती मुलगी असेल जी 'क्या उखाड लोगे' यासारखे शब्द वापरत असेल.



ज्येष्ठ सहकलाकार अभिनेत्री जया बच्चन यांच्याशी चुकीचं वर्तणूक करत असेल. हा योग्य व्यवहार आहे का? ही भारतीय संस्कृती आहे का? भारतीय संस्कृतीच्या कोणत्या पानावर अशी शिकवण दिली आहे?' राम गोपाल वर्मा यांच्याबरोबरच पूजा भट्ट, स्वरा भास्कर, अनुभव सिन्हासह अनेक कलाकारांनी उर्मिला मातोंडकरच्या समर्थनात उभे राहिले आहेत.