रामलल्लांच्या `या` गाण्यातून पुन्हा एकदा अनुभवता येणार गानसम्राज्ञी लता मंगेशकरांचा आवाज, पाहा व्हिडीओ
सध्या सोशल मीडियावर `राम आएंगे` हे गाणं ट्रेंड होत आहे. आता याचा एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे.
Ram Mandir 2024 inauguration : येत्या सोमवारी 22 जानेवारीला अयोध्या नगरीत प्रभू श्रीरामांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्यासाठी जय्यत तयारी पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील विविध क्षेत्रातील दिग्गजांना आमंत्रण पाठवण्यात आले आहे. सध्या सोशल मीडियावर 'राम आएंगे' हे गाणं ट्रेंड होत आहे. आता AI ने चक्क दिवंगत गाणसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या आवाजात ते रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला आहे. याचा एक व्हिडीओही समोर आला आहे.
सध्या संपूर्ण देशभर प्रभू श्री रामांचा जयघोष पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियासह सर्वत्रच राम आयेंगे हे गाणं ट्रेंड होताना दिसत आहे. स्वाती मिश्रा यांनी हे गाणं गायलं आहे. आता सध्या सोशल मीडियावर लतादीदींच्या आवाजातील 'राम आएंगे' हे गाणं तुफान व्हायरल होत आहे. AI च्या मदतीने हे गाणं लता मंगेशकर यांच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आले आहे.
एका AI युजरने हा व्हिडीओ युट्यूबवर प्रदर्शित करण्यात आला आहे. AI आणि साऊंड इंजिनिअरिंगच्या मदतीने हा ऑडिओ तयार करण्यात आला आहे. हा ऑडिओ कोणत्याही आर्थिक लाभासाठी तयार करण्यात आलेला नाही, असेही त्याने यात म्हटले आहे. तसेच त्याने संबंधित गायक, संगीतकार यांचा आदर ठेवून ही कृती तयार केली आहे.
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओचे अनेक चाहते कौतुक करताना दिसत आहेत. तसेच या व्हिडीओवर अनेक नेटकरी कमेंट करत कौतुक करतानाही दिसत आहेत. राम आएंगे हे मूळ गाणं प्रसिद्ध गायिका स्वाती मिश्रा यांनी गायलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या गाण्याचं कौतुक केलं आहे. भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांचे 2 वर्षांपूर्वी निधन झाले. मात्र त्यांच्या आवाजाची जादू आजही देशवासियांच्या मनात आहे. त्यातच आता 'राम आएंगे' हे गाणं AI ने त्यांच्या आवाजात रेकॉर्ड करत चाहत्यांना एक अनोखं सरप्राईज दिलं आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकजण थक्क झाले आहेत.
कशी आहे रामलल्लाची मूर्ती
दरम्यान प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची गर्भगृहात स्थापना करण्यात आली आहे. त्याची पहिली झलकही समोर आली आहे. प्रभू श्रीरामाचं बालरुप डोळे दिपवणारं आहे. म्हैसूर येथील प्रख्यात मूर्तीकार अरुण योगीराज यांनी रामलल्लाची ही मूर्ती घडवली आहे. 51 इंचांची ही मूर्ती काळ्या शाळिग्राम शिळेपासून बनवण्यात आली आहे. श्री रामलल्लाची मूर्ती गर्भगृहात स्थापन करण्यातपूर्वी विधी आणि पूजा करण्यात आल्या. काशीहून आलेल्या विद्वानांनी कार्यक्रम संपन्न केला. 121 आचार्यांनी विधीप्रमाणे पूजा केली. 200 किलो वजनाच्या रामललाच्या मूर्तीचा जलाभिषेक करून गर्भगृहात स्थापना करण्यात आली.