मुंबई : रामानंद सागर यांच्या रामायण या पौराणिक मालिकेतील प्रत्येक कलाकाराची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. राम-सीता, भरत, लक्ष्मण, हनुमान असो वा रावण. रावणाची भूमिका साकारणारे अरविंद त्रिवेदी सध्या जरी टीव्हीवर व्यस्त नसले तरी त्यांची भूमिका आजही लोकांच्या लक्षात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीव्हीवर लंका नरेशची भूमिका करणाऱ्या अरविंद त्रिवेदी यांनी रामायणातील भूमिका इतक्या ताकदीने साकारली की त्यानंतर त्यांना तशाच खलनायक धाटणीच्या भूमिका मिळायल्या लागल्या.


अरविंद मूळचे मध्य प्रदेशातील इंदूरचे. अरविंद यांचे मध्य प्रदेशात लहानपण गेले मात्र गुजरातमध्ये ते वाढले, शिकले. अरविंद यांचे मोठे भाऊ उपेंद्र त्रिवेदी गुजराती थिएटरमधील प्रसिद्ध अभिनेते होते. आपल्या भावाला पाहतच ते या क्षेत्रात आले. 


अरविंद यांनी रामायणाव्यतिरिक्त गुजरात आणि हिंदीमधील तब्बल ३०० सिनेमांमध्ये काम केलेय. रामानंद सागर यांनी रामायणातील रावणाच्या भूमिकेसाठी तब्बल ३०० कलाकारांचे ऑडिशन घेतले होते. मात्र जेव्हा अरविंद यांनी रावणाचा गेटअप घेतला तेव्हा रामानंद सागर यांनी तात्काळ त्यांना रावणाच्या भूमिकेसाठी निवडले. 


अरविंद यांनी रामायणानंतर विश्वमित्र या मालिकेतही काम केले. मात्र ९०च्या दशकातच त्यांनी टीव्ही विश्वापासून दूर जात राजकारणात प्रवेश केला. त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली आणि जिंकलीही