मुंबई : बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित चित्रपट ‘आदिपुरुष’ ची (Adipurush) प्रतिक्षा चाहते करत आहेत. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. तेव्हापासून चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. आता या सगळ्यात छोट्या पडद्यावरील लोकप्रिय असलेल्या ‘रामायण’ या लोकप्रिय मालिकेची निर्मिती करणारे रामानंद सागर यांचा मुलगा प्रेम सागर यांनी यावर त्यांच मत मांडलं आहे.  


बातमीची लिंक : आलियानंतर 'या' कारणामुळे बिपाशा बासू नेटकऱ्यांच्या निशाण्यावर, पाहा काय म्हणाले नेटकरी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रेम सागय यांनी नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत प्रेम सागर यांना ‘आदिपुरुष’ चित्रपटाबाबत त्यांचे विचार मांडले. या मुलाखतीत ते म्हणाले, 'तुम्ही कोणालाच काही बनवण्यापासून थांबवू शकत नाही. काळानुसार धर्म बदलतो. चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांना जे ठीक वाटलं ते त्यांनी केलं.'


बातमीची लिंक : शरद पवारांच्या 'त्या' वक्तव्यावर विवेक अग्निहोत्रीची खोचक टीका, म्हणाला...


दरम्यान, या मुलाखतीत प्रेम सागर यांनी चित्रपटाची बाजू घेण्यास नकार दिला आणि ओम राऊतने या चित्रपटाला रामायण म्हटलेलं नाही असंही सांगितलं. याशिवाय त्यांना असा एखादा प्रोजेक्ट मिळाला असता तर त्यांनी तो कधीच केला नसता कारण त्यांच्यावर तसे संस्कार नाही ना ती त्यांची संस्कृती असं त्यांनी या मुलाखतीत सांगितलं.


आणखी वाचा : करण जोहरबाबत शाहरुख खानचं मोठ वक्तव्य; 'होय, आम्ही एकत्र...'


 प्रेम सागर यांनी ‘अलिफ लैला’, ‘विक्रम वेताळ’ अशा काही लोकप्रिय टीव्ही मालिकांची निर्मिती केली होती. याशिवाय ‘बसेरा’ आणि ‘आरजू है तू’ या त्यांच्या गाजलेल्या मालिका आहेत. ‘आदिपुरुष’बाबत टीव्हीवरील राम अर्थात अभिनेते अरुण गोविल यांनीही प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी या टीझरवर नाराजी व्यक्त केली होती.