मुंबई : अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर ayodhya अयोध्येमध्ये राम जन्मभूमीचा वाद मिटला आणि Ram Mandir राम मंदिर उभारणीचा मार्ग मोकळा झाला. अतिशय भव्य अशा स्वरात रामनगरी अयोध्येमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा पार पडला. प्रत्येकानंच आपल्या परिनं या क्षणाचा आनंद साजरा केला. अगदी यापासून प्रेक्षकांच्या मनात घर केलेले राम आणि सीता सुद्धा वेगळे राहिले नाहीत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियाच्या माध्यमातून Ramayan रामायण या मालिकेतून रामाची मध्यवर्ती भूमिका साकारणाऱ्या अभिनेता अरुण गोविल आणि सीतेच्या भूमिकेत झळकलेल्या दीपिका चिखलीया यांनी आनंद भावना व्यक्त केल्या. 
'आजचा दिवस इतिहासात सुवर्णाक्षरांमध्ये लिहिला जाईल. राम मंदिर भूमिपूजनाच्या निमित्तानं संपूर्ण जगभरातील राम भक्तांचं स्वप्न साकार होत आहे. तुम्हा सर्वांनाच खुप साऱ्या शुभेच्छा', असं लिहित जय श्रीराम या घोषासह गोविल यांनी आपली प्रतिक्रिया दिली. 


तर, फेसबुकवर व्हिडिओ पोस्ट करत राम नामाचा जप करत दीपिका चिखलिया म्हणजेच ऑनस्क्रीन सीतेची भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्रीनं सर्वांनाच या ऐतिहासीक क्षणाच्या शुभेच्छा दिल्या. 



This is a matter of pride for all Indians ...home coming and welcoming the lord back after a struggle of 500years ...

Posted by Dipika Chikhlia Topiwala on Tuesday, August 4, 2020

अयोध्येमध्ये राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडत असतानाच प्रत्येकानं या सोहळ्याच्या वेळी आपल्या परिनं या क्षणात सहभागी होण्याचा प्रयत्न केला. अनेक वर्षांची प्रतिक्षा अखेर संपली आहे, अशी भावना खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संबोधनपर भाषणातून दिली. तर, सर्वांनीच आपल्या मनातही अयोध्या नगरी वसवली पाहिजे अशी भावना सरसंघचालक मोहन भागवत यांनीही व्यक्त केली.