`रामायण`ने पुन्हा एकदा मोडले सर्व रेकॉर्ड
`मंगल भवन अमंगल हारी... `
मुंबई : सध्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सरकारने संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फटका कलाविश्वाला देखील लागला आहे. लॉकडाऊनमुळे सर्वच मालिकांचे आणि चित्रपटांचे शूटींग थांबवण्यात आले आहेत. म्हणून अनेक वाहिन्यावर प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी जुन्या मालिका पुन्हा प्रसारित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी 'रामायण' ही मालिका दुरदर्शनवर पुन्हा एकदा प्रसारित करण्याचा निर्णय घेतला. २८ मार्च पासून ही मालिका सकाळी ९ ते १० आणि रात्री ९ ते १० या कालावधीत प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी प्रसारित करण्यात येते आहे.
पुन्हा प्रसारित करण्यात आलेल्या या मालिकेला चाहत्यांकडून तुफान पसंती मिळताना दिसत आहे. सर्व कुटुंब एकत्र बसून या मालिकेचा आनंद घेत असल्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर देखील व्हायरल झाले. काही दिवसांतच या मालिकेने पुन्हा एकदा यशाचे शिखर गाठले आहे. रामायणने टीआरपीमध्ये सारे रोकॉर्ड मोडीत काढले आहेत.
प्रसार भारतीचे अध्यक्ष शशी शेखर यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. 'मला सांगायला अत्यंत आनंद होत आहे की, २०१५ नंतर रामायण दूरदर्शनवर सर्वात जास्त टीआरपी मिळवणारा शो ठरला आहे.' अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
दरम्यान आपआपल्या घरी असणाऱ्या प्रत्येक देशवासियाच्या, प्रेक्षकांच्या मनोरंजनाची जबाबदारी घेण्यासाठी ही मंडळी धडपड आहेत. त्यातच आका कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रत्येकाने जबाबदारीने आणि स्वयंशिस्तीने वागत आपल्या वाट्याला आलेलं हे आव्हान परतवून लावण्यामध्या हातभार लावणं अपेक्षित आहे.