...जेव्हा एकाच अभिनेत्यानं साकारली राम आणि सीतेची भूमिका; एकही डायलॉग नसतानाही भारावले होते प्रेक्षक
राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात आता चर्चा सुरु आहे, ती एका मुकपटाची... त्या एकाच अभिनेत्यानं साकारली होती राम आणि सीतेची भूमिका
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराच्या प्राणप्रतिष्टा आणि उद्घाटना सोहळा रंगणार आहे. अयोध्येत या भव्य सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असून, रामनामाच्या लाटेने लोकांमध्ये उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे. भगवान रामाची कथा लोकांपर्यंत पोहोचवण्यात साहित्य संगीतासोबतच सिनेमाने मोलाची भूमिका बजावली आहे. मूकपटांच्या काळातही रामायणावर आधारित चित्रपटाने प्रचंड लक्ष वेधले होते. 1917 मध्ये रिलीज झालेल्या, 'लंका दहन' नावाच्या या चित्रपटानं चित्रपटगृहांबाहेर खळबळ माजवली, हा चित्रपट पाहण्यासाठी मुंबईत 23 आठवड्यांपर्यंत लांबलचक रांगा लागल्या होत्या. या चित्रपटातून भगवान रामाचं कथा प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी भारतीय सिनेमाच्या सुरुवातीला दिलेल्या योगदानांप एक मानले जाते.
भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून ओळखले जाणारे दादासाहेब फाळके यांनी भगवान राम आणि कृष्ण यांच्या कथांनी प्रेरित चित्रपट बनवण्याची संकल्पना मांडली. 1913 मध्ये 'राजा हरिश्चंद्र' हा भारतातील पहिला वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट तयार केल्यानंतर, या पूज्य देवतांच्या कथांचे चित्रण करण्याच्या महत्त्वाकांक्षेने फाळके यांनी आपला चित्रपट प्रवास सुरू ठेवला.
भारतीय चित्रपटसृष्टीचं जनक म्हणून ओळखले जाणारे दादासाहेब फाळके यांनी भारतातील पहिला फिचर फिल्म 'राजा हरिश्चंद्र' हा चित्रपट बनवला सिनेमा बनवण्याची कल्पना दादासाहेबांच्या मनात आली जेणेकरून एक दिवस ते प्रभू राम आणि कृष्णाच्या कथा सिनेमाच्या पडद्यावर आणू शकतील.
1906 मध्ये दादासाहेबांनी 'द लाइफ ऑफ क्राइस्ट' हा चित्रपट सिनेमागृहात पाहिला तेव्हा पडद्यावर येशूचे चमत्कार पाहून त्यांना वाटले की भारतीय देव राम आणि कृष्ण यांच्या कथाही अशाच पद्धतीनं पडद्यावर येऊ शकतात आणि याच कल्पनेतून चित्रपट व्यवसायात प्रवेश केला. भारतीय पौराणिक कथांवर आधारित 'राजा हरिश्चंद्र' बनवल्यानंतर दादासाहेबांनी त्यांच्या दुसऱ्या चित्रपटाच्या कथेसाठी 'रामायण' हा विषय निवडला .
मात्र, त्यांना पहिल्या चित्रपटात म्हणजेच 'राजा हरिश्चंद्र'मध्ये राणी तारामती हे पात्र साकारणारा कलाकार शोधताना खूप त्रास सहन करावा लागला होता. दादासाहेबांनी स्त्री अभिनेत्रींच्या कास्टिंगसाठी दिलेली जाहिरात पाहून त्याकाळातील काही सेक्सवर्कर्सनी काम करण्यास उत्सुकता दाखवली होती.
तारामतीसाठी कसा भेटला अभिनेता?
मात्र, सततच्या शोधामुळे त्रासलेले दादासाहेब एके दिवशी ग्रँट रोडवरील एका हॉटेलमध्ये चहा पीत बसले होते. त्या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कृष्ण हरी उर्फ अण्णा साळुंके यांच्यावर त्यांची नजर पडली. या मुलाचं शरीरयष्टी स्त्री पात्र साकरण्यातही अनुकूल असल्याचं त्यांना वाटलं. महिना 10-15 रुपये पगारावर काम करणाऱ्या साळुंके यांना त्यांनी सोबत आणले आणि याच अण्णा साळुंके यांनी 'राजा हरिश्चंद्र' या भारतातील पहिल्या फिचर फिल्ममध्ये पहिलं स्त्री पात्र साकारलं होतं.
पुढे जाऊन 'लंका दहन' हा चित्रपट बनवण्याचा जेव्हा दादासाहेबांनी निर्णय घेतला. तेव्हा सीतेच्या भूमिकेसाठी त्यांच्याकडे अण्णा साळुंखे हा अभिनेता तर होताच. मात्र प्रश्न होता रामच्या भूमिकेचा अशावेळी दादासाहेबांनी रामाची भूमिका साकारण्यासाठी अण्णा साळुंके यांचा विचार केला, अण्णा साळुंके यांनी आपल्या अभिनयाला गांभीर्याने घेतलं आणि खूप मेहनत घेतल्याचं सांगितले जाते. अशा प्रकारे, दुहेरी भूमिका असलेला हा पहिला भारतीय चित्रपट ठरला आणि अण्णा साळुंके हा दुहेरी भूमिका साकारणारा पहिला भारतीय अभिनेता ठरला!
हेही वाचा : राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचं निमंत्रण मिळूनही Jr NTR नाही लावणार हजेरी! कारण...
चित्रपटाची लोकप्रियता इतकी होती की लोक अनेक आठवडे थिएटरबाहेर रांगा लावत असत तिकीट खिडकीवर देखील या चित्रपटानं बक्कळ कामं केली होती. 'लंका दहन'च्या यशानं भविष्यातील चित्रपट निर्मात्यांना अशाच पौराणिक विषयांचा शोध घेण्याचा मार्ग मोकळा केला.
चित्रपटात रामायणाची कथा सादर करण्याचा हा पहिला प्रयत्न खूप यशस्वी ठरला. 'लंका दहन' या मूकपटापासून सुरू झालेला रामायणाचा ऑनस्क्रीन प्रवास काळानुसार आणि तंत्रज्ञानासोबत बदलत गेला जो अलिकडल्या 'आदिपुरुष'पर्यंत सुरू राहिला.