रणबीर कपूरसाठी हा दिग्दर्शक ठरला लकी? का ते जाणून घ्या
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट तिच्या प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफमुळे चर्चेत असते.
मुंबई : दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांची लव्हस्टोरी संजय लीला भन्साळी यांच्यासमोर सुरू झाली हे सर्वांनाच माहीत आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की, दीपिकाचा एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूरची आलिया भट्टसोबतची लव्हस्टोरीही संजय लीला भन्साळी यांच्यासमोरच सुरू झाली होती. ही वेगळी गोष्ट आहे की जेव्हा आलिया भट्ट पहिल्यांदा रणबीर कपूरला संजय लीला भन्साळीच्या सेटवर भेटली तेव्हा ती फक्त 11 वर्षांची होती. होय, बॉलिवूडचं हे पॉवर कपल काही वर्षांपूर्वी संजय लीला भन्साळी यांच्या ब्लॅक चित्रपटाच्या सेटवर भेटले होते.
सध्या आलिया भट्टच्या एक मुलाखतीची क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या मुलाखतीत आलिया भट्टने सांगितलं आहे की, जेव्हा ती ब्लॅक सिनेमाच्या सेटवर रणबीर कपूरला पहिल्यांदा भेटली तेव्हा ती फक्त 11 वर्षांची होती. पण तरीही रणबीर कपूरसमोर आलिया भट्ट खूप लाजत होती.
आलिया भट्टने तिच्या मुलाखतीत सांगितलं की, ''जेव्हा मी रणबीर कपूरला भेटले तेव्हा तो संजय लीला भन्साळी यांना असिस्ट करत होता. आणि यावेळी मला रणबीरसोबत फोटोशूट करायला सांगितलं होतं. पण त्यावेळी मी खूप लाजाळू होते, कारण मला माझं डोकं त्याच्या खांद्यावर ठेवावं सांगितलं होतं. पण मला ते करताच येत नव्हतं. कारण तो माझ्यासाठी खूप शाय सीन होता.
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट तिच्या प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफमुळे चर्चेत असते. एकीकडे तिचा आगामी चित्रपट गंगूबाई काठियावाडी प्रदर्शित होण्याच्या वाटेवर आहे तर दुसरीकडे तिचं रणबीर कपूरसोबतचं नातं देखील चर्चेचा भाग आहे.