मुंबई : रणबीर कपूर सध्या आलिया भट्टसोबत आनंदी वैवाहिक जीवन जगत आहे. पण आलियाने आयुष्यात प्रवेश करण्याआधी त्याच्यावर लाखो मुली मरायच्या. एक मुलगी रणबीर कपूरवर इतकी एट्रॅक्ट झाली होती की, ती त्याच्याशी लग्न करण्यासाठी घरी पोहोचली होती. रणबीर कपूरच्या बंगल्याच्या गेटसोबत त्या मुलीचं लग्न झालं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तेव्हापासून लोकं या मुलीला रणबीरची पहिली पत्नी मानू लागले. त्यामुळे रणबीरची 'पहिली पत्नी' असं प्रश्न गुगलवर सर्च केलं जात आहेत. अलीकडेच रणबीरने त्याच्या 'पहिल्या पत्नी'बद्दल बोलताना एक मजेदार खुलासा केला आहे.


रणबीर कपूरने दिलेल्या एका मुलाखतीत स्वतःबद्दलच्या काही मजेदार Google प्रश्नांची उत्तरं दिली. यातील एक प्रश्न त्याच्या पहिल्या पत्नीबद्दलही होता. याबद्दल, रणबीर कपूरने अनेक वर्षांपूर्वीचा एक किस्सा सांगितला, जो त्याच्या एका वेड्या महिला चाहतीशी संबंधित होता.


रणबीरच्या बंगल्याच्या गेटवर एका मुलीचं लग्न होतं
रणबीर कपूर म्हणाला, 'एक मुलगी होती जिला मी कधीही भेटलो नाही किंवा पाहिलं नाही. पण माझ्या वॉचमनने मला सांगितलं की, ती एका पंडितसोबत आली होती आणि माझ्या बंगल्याच्या गेटसोबत तिने लग्न केलं. गेटवर काही फुलंही पडली होती. त्यामुळे मी हे पाहून वेडा झालो होतो. त्यामुळे बघितलं तर मी माझ्या पहिल्या पत्नीला अजूनही भेटलेलो नाही. पण मला तुम्हाला कधीतरी भेटायला नक्कीच आवडेल.


या मुलाखतीत रणबीरने आणखी अनेक मजेशीर खुलासे केले आहेत. त्याने सांगितलं की, तो लवकरच टॅटू काढणार आहे. हा टॅटू एकतर त्याच्या लकी नंबर 8 चा असेल किंवा त्याच्या मुलांच्या नावाचा असेल. रणबीरने 14 एप्रिल 2022 रोजी आलियाशी लग्न केलं. लग्नानंतर दोघंही आता ९ सप्टेंबरला प्रदर्शित होणाऱ्या 'ब्रह्मास्त्र'मध्ये दिसणार आहेत. रणबीर आणि आलियासाठी हा चित्रपट खूप खास आहे कारण याच्या शूटिंगदरम्यान दोघंही एकमेकांच्या जवळ आले होते आणि त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.