मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाची सगळेजण आतुरतेने वाट पाहत आहेत. लग्नाचे विधी सुरू झाले आहेत. ज्याची सुरुवात गणेश पूजनाने झाली आहे. पूजेनंतर लग्नाचा पहिला विधी म्हणजे मेहंदी समारंभ. आलियाच्या मेहंदी समारंभानंतर इतर सगळे विधी पार पडणार असल्याचं सांगण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वेन्यू पर्यंत पोहोचले दोघांचे परिवार
या लग्नाला रणबीर कपूर आणि आलिया भट्टचं कुटुंबीयही पोहोचले आहेत. नीतू कपूर, रिद्धिमा कपूर, महेश भट्ट, पूजा भट्ट, करीना कपूर, करिश्मा कपूर, रीमा जैनपर्यंत सगळे सेलिब्रिटी दिसले.



 



टाइट सिक्योरिटी मध्ये लग्नाचे विधी सुरु
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा विवाहसोहळा भव्य होणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. पाहुण्यांसाठी तसंच सुरक्षा रक्षकांसाठी स्वतंत्र बँड तयार करण्यात आले आहेत. प्रत्येकजण या लग्नाच्या फोटो आणि व्हिडिओची आतुरतेने वाट पाहत आहेत.




प्रायवेसीला मेंटेन करावं लागेल
रणबीर कपूर आलिया भट्टच्या लग्नाची गोपनीयता राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. लग्नाच्या ठिकाणापासून ते विधींच्या तारखेपर्यंत सगळं काही गुप्त ठेवलं जात आहे. प्रत्येक भेट देणाऱ्या पाहुण्यालाही ही गोपनीयता पाळावी लागेल.



सिक्युरिटी युनिटजवळ स्टिकर्सचे रोल्स देण्यात आले असून आता सर्व पाहुण्यांचे मोबाईल कॅमेरे कव्हर केले जातील. रणबीर आलियाच्या लग्नाचे फंक्शन्स आता सुरू होणार आहेत. मात्र, अद्याप कुटुंबीयांकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


आता या दोघांच्या मेहेंदीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमात नीतू कपूर, रिद्धिमा कपूर, महेश भट्ट, पूजा भट्ट, करीना कपूर, करिश्मा कपूर, रीमा जैन, करण जोहर याचबरोबर अनेक सेलिब्रिटी हळूहळू स्पॉट होत आहेत. एवढंच नव्हेतर एक व्हिडिओदेखील सोशल मीडियावर समोर आला आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, एका चाहत्याच्या हातात सोन्याचा वर्क असलेला बूके दिसत आहे. हा बूके गोल्ड प्लेटेड आहे. त्यांचे हे चाहते सुरत वरुन आले आहेत.